नांदेड(प्रतिनिधी)-19 जुलै रोजी हिमाचल प्रदेश पोलीस नांदेड मधील फळ व्यापारी आणि माजी कॉंगे्रस नगरसेवक हबीब बागवान यांना घेवून गेले होते. त्यांच्याविरुध्द 420 भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल आहे अशी नोंद नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल होती. पण हबीब बागवान गायब झाले अशी तक्रार हिमाचल प्रदेश पोलीसांनी दिली आणि आज अचानकच हबीब बागवान नांदेडमध्ये अवतरले आहेत. हा सगळा काय खेळ आहे याबाबत काही माहिती अद्याप मिळालेेली नाही.
19 जुलै रोजी हिमाचल प्रदेश पोलीस नांदेड येथील हबीब बागवान यांना घेवून गेले. पण हबीब बागवानला घेवून पोलीस पथक ईटारसी येथे गेले आणि तेथून त्यांनी प्रवासाचे वॉरंट घेतले. इटारसीपर्यंत पोलीस आणि हबीब बागवान एकाच चार चाकी गाडीमध्ये गेले होते. तेथून त्यांनी ती चार चाकी सोडली आणि पुढचा प्रवास रेल्वे सुरू केला. पुढे हिमाचल प्रदेश पोलीसांनी राजस्थानमधील धौेलपूर येथून हबीब बागवान पोलीसांच्या हातावर तुरी देवून पळून गेलाचा गुन्हा भरतपूर पोलीस ठाण्यात दाखल केला. एका पायाने अधु असलेले हबीब बागवान पळून गेले. याच्यावर कोणाचाच विश्र्वास बसला नाही.
त्यानंतर हबीब बागवान यांच्या कुटूंबियांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबीयस कॉर्पस याचिका दाखल केली. या संदर्भाने उच्च न्यायालयाने कोणाला नोटीस काढली याची माहिती प्राप्त झाली नाही पण आजच्या परिस्थितीनुसार आज दुपारी 3.45 वाजता हबीब बागवानने आपले बंधू शकील बागवान यांना फोन केला आणि मी भोकरफाट्यावर आहे असे सांगितले. तेंव्हा शकील बागवानने जावून त्यांना नांदेडला आणले आणि पोलीस ठाणे विमानतळ येथे हजर केले.
या सर्व प्रकरणामध्ये काही तरी गडबडी आहेतच असे दिसते. कारण हबीब बागवान पळून गेले असतील तर त्यावेळेस पैसे नसतील. मग त्यांनी धौलपूर ते नांदेडचा प्रवास कसा केला हा प्रश्न आहे. आता हिमाचल प्रदेशात दाखल असलेला गुन्हा प्रलंबित आहेच. तसेच राजस्थानच्या भरतपूरमध्ये पोलीसांच्या अभिरक्षेतून पळून गेल्याचा गुन्हा सुध्दा प्रलंबित आहे. म्हणूनच म्हणतात कोणाच्या मनातले काय आहे हे ओळखता येत नाही.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/07/25/कॉंगे्रसचे-माजी-नगरसेवक/