नांदेड(प्रतिनिधी)-मौजे मंडगी ता.देगलूर येथे एका 38 वर्षीय व्यक्तीचा खून पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन करण्यात आला आहे. देगलूर पोलीसांनी दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दोन मारेकऱ्यांपैकी एकाला देगलूर पोलीसांनी अटक केली आहे.
शैलेंद्र दौलतराव जाधव रा.मंडगी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे चुलत भाऊ मारोती नागोराव जाधव (38) यांचे मल्लीकार्जुन लक्ष्मण लोणे आणि श्रीनिवास निवृत्ती लोणे यांच्यासोबत एका महिन्यापुर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरुन मल्लीकार्जुन आणि श्रीनिवास यांनी 27 जुलैच्या रात्री 10.30 वाजेच्यासुमारास मारोती जाधवच्या टोक्यात, पाठीवर, कपाळावर मारुन त्यांचा खून केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी मल्लीकार्जुन लक्ष्मण लोणे आणि श्रीनिवास निवृत्ती लोणे या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 नुसार गुन्हा क्रमांक 353/2023 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक रवि मुंडे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.पोलीसांनी मारेकरी मल्लीकार्जुन लक्ष्मण लोणेे यास अटक केली आहे.
जुन्या भांडणाच्या वादातून मंडगी येथे खून