नांदेड (प्रतिनिधी)-19 लाख रुपयांचा मुर्गीदाना भरलेला ट्रकच तीन जणांनी बळजबरी पळवून नेल्याचा प्रकार नायगाव ते नरसी रस्त्यावर फॅमीली शॉपसमोर घडला आहे.
सचिन विठ्ठल पहेलवान रा.बाभुळगाव ता.कंधार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.29 जुलैच्या सायंकाळी 4.30 वाजेच्यासुमारास ते आपला ट्रक क्रमांक एम.एच.12 पी.क्यु.9381 घेवून जात होते. या ट्रकमध्ये मुर्गीदाना भरलेला होता. त्यांनी आपली ट्रक फॅमीली शॉपसमोर उभी केली आणि किराणा सामान घेण्यासाठी गेले असतांना काही आरोपी विकास उर्फ बिल्ला आनंदा गायकवाड(20), अक्षय रावसाहेब वाघमारे(27) आणि शेख सोहेल शेख मैनोद्दीन (23) या तिघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. आरोपींनी आपल्या हातातील कड्याने त्यांच्या डोक्यात मारले. त्यांच्याच ट्रकमधील टॉमी घेवून त्यांना त्याचा धाक दाखवून समोरचे दोन काच फोडून ट्रक आणि त्याच्यामधील मुर्गीदाना बळजबरीने घेवून पळून गेले आहेत. 44 लाख 55 हजार 500 रुपयांचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटला आहे. नायगाव पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 394 नुसार गुन्हा क्रमांक 100/2023 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक साहेबराव गुट्टे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे हे करीत आहेत.दरोडा टाकणारे तिन्ही आरोपी नायगाव पोलीसांनी गजाआड केले आहेत.
ट्रकसह मुर्गीदाना असा 45 लाख 55 हजारांचा ऐवज लुटला ; तिन दरोडेखोर जेरबंद