नांदेड(प्रतिनिधी)-आजच्या बेरोजगारीमुळे बेजार झालेल्या युवकांमध्ये काय रोष उत्पन्न झाला आहे याचा रोष रॅपमधून नांदेड येथील डॉ.आंबेडकरनगरच्या काही युवकांनी व्यक्त केला आहे. देशातील परिस्थिती, घरातील परिस्थिती, समाजातील परिस्थिती आणि आपली गरज यातून हा विद्रोही विचार मांडला आहे, विद्राही साई पाटील यांनी.
आजच्या परिस्थितीत युवकांकडे काम नाही. लोकसंख्येच्या मानाने नोकरी संख्या तशी नाही. शासकीय कामांमध्ये सु ध्दा जेवढ्या पदांना मान्यता आहे. त्यापेक्षा कमी संख्या बळात शासकीय कामकाज सुरू आहे. संख्या बळ कमी असल्यामुळे अनेकदा जनतेच्या कामावर त्याचा परिणाम होतो.त्यातून भांडणे होतात आणि वेगळेच काही तरी घडते. घरात बसुन 25 वर्षाचा झाला म्हणून आई शिव्या देत आहे, तुला समाज सुध्दा नाव ठेवली, दिवसभर तु फिरत राहतो, किती दिवस माझ्या जिवावर खाणार असे टोमणे आई देत आहे. प्रियसी म्हणते आहे माझे खुप प्रेम आहे तुझ्यावर परंतू सरकारी नोकरी नाही लागणार तो पर्यंत माझ्या घरचे तुला होकार देणार नाहीत.समाजातील लोक सांगत आहेत याची आई कामाला जाते आणि हा आम्हाला ज्ञान शिकवतो आहे. यावर एक शेजारी त्या युवकाच्या आईला म्हणतो ताई याला पाठवून द्या माझ्यासोबत पुण्याला मी याला ओळखीने नोकरी लाऊन देतो.
अशा या पार्श्वभूमीवर विद्रोही साई पाटीलने स्वतंत्र भारताचा बेरोजगार बोलतो असा एक विद्रोही रॅप तयर केला आहे.या रॅपमध्ये त्याचे साथीदार तेजस सावंत, मोहन इंगोले आणि प्रज्योत कांबळे हे आहेत. हा रॅप लिहिला आणि गायला आहे विद्रोही साई पाटीलने. या रॅपचा व्हिडीओ प्रेम धुमाळे या युवकाने तयार केला आहे. प्रत्येकाने एकदा हा रॅप पाहायला आणि लक्ष पुर्वक ऐकायला हवा. जेणे करून आजच्या जगातील परिस्थिती लक्षात येईल.
आपला रॅप सुरू करतांनाच बस आता विद्रोही बोलणार असे शब्द सुरू करून आजच्या भोंगळ वास्तवाची पोल मी खोलणार ज्यामुळे पायाखालची जमीन हलेल असा विचार व्यक्त करण्यात आला आहे. माझ्या डोक्यात किती प्रश्न आहेत त्यामुळे वादळ उठेल शिकलेले येथे देवाच्या पायऱ्यांवर आहेत आणि बॉलिवुडचे गावंढळ सर्व संसदेत जाऊन बसले आहेत. शिकलेल्यांच्या हाताला नोकरी नाही त्यामुळे आमचे जिवन लाचार झाले आहे. आम्हाला काही पेन्शन नाही आणि काही भत्ता नाही. मी आज रॅपर झालो असलो तरी 12 वीला मी गुणवत्ता यादीत होतो. या परिस्थितीने माझा खुप वापर केला. न शिकलेले झाले देशाचे मालक आणि शिकलेले आम्ही राहिलो नोकर. पोलीस भरतीबद्दल बोलतांना या रॅपमध्ये सांगितले आहे की, कोपर फुटेपर्यंत मेहनत केली, एमपीएससी, युपीएससीमुळे झोप येत नाही तरी नोकरी नाही आणि आमच्या नशिबात मात्र खेटर आहेत.
शिक्षणाच्या नावाखाली झाल्या घोटाळ्यांचा उल्लेख आपल्या रॅपमध्ये करतांना विद्रोही साई पाटील सांगतो आमच्या डिग्रीचा काही उपयोग झाला नाही. त्याला कपाळाला लावून बसलो आणि देश मात्र चालवतो चायवाला याचा उल्लेख केला आहे. 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील याचा उल्लेख सुध्दा विद्रोही साई पाटील याने आपल्या रॅपमध्ये केला आहे. कोणत्या योजना आल्या नाहीत आणि त्या योजनांच्या नावावर निवडणुका संपवल्या गेल्या. त्या योजनांमध्ये नेत्यांनीच आपल पोट भरल आणि आम्हाला कष्टावर कमी आणि भाषणावर जास्त भरवसा राहिल्यामुळे आम्ही तुमच्या चुली ठरलो आहोत.आमच्या जिवनाची होळी झाली म्हणून होळीत बोंब मारतात तशी बोंब सुध्दा या रॅपमध्ये जोडली आहे. या सिस्टममुळे सगळ झाकल गेल. गुन्हेगारी वाढली, बेरोजगारी वाढली, हजारात एकाला नोकरी मिळाली मग उरलेल्या 999 च काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. स्वप्न सारे राख झाले नेते मात्र गप्पच होते. गल्लीतले गुंड खुलेआम चालवतात दोन नंबरचे धंदे.
महाराष्ट्राबद्दल बोलतांना या रॅपमध्ये अर्धा महाराष्ट्र बेरोजगार केला आणि करोडोचा प्रकल्प गुजरातला नेला. आपल्या त्रासाला कंटाळून युवक आत्महत्या करतो पण त्याचा परिणाम कुठल्या आमदारावर होत नाही. कुठ मांडायच्या आमच्या व्यथा आम्ही, बेरोजगार हे नाव कपाळावर गोंदुन घ्याव काय? आमच्या हक्कांसाठी आम्ही किती रक्त सांडायच. बेरोजगारीचा मुद्दा वाढला असतांना जातीभेद सुध्दा वाढला. युवक लढतो धर्मासाठी ही खेदाची बाब आहे. आमच्या व्यवस्थेवर आपण बोलल पाहिजे हे घटनेने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यात दिलेला अधिकार आहे.
विद्रोही साई पाटील आणि त्यांच्या मित्रांनी अत्यंत छोट्या-छोट्या जागेत आणि आवश्यकतेपेक्षा अत्यंत कमी साधनांमध्ये या युवकांनी तयार केलेला रॅप म्हणजे आपल्याला वाटले तर आपण काहीपण करू शकतो याचे जिवंत उदाहरण आहे. मोठे कॅमेरे नाहीत, लाईट नाहीत, इफेक्टस् नाहीत तरी पण या युवकांनी केलेली ही मेहनत त्यांना नाव देईलच अशी अपेक्षा आहे. वाचकांसाठी विद्रोही साई पाटीलचा रॅप आम्ही बातमीसोबत जोडला आहे.
संबंधीत रॅप…