नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव आणि त्यांच्या पथकाने नांदेड शहरातील अनेक अनाधिकृत कॉफी शॉपवर छापे टाकून अश्लील वर्तन करणाऱ्या तुरुण -तरुणींना समज दिली आहे.
नांदेड शहरातील भाग्यनगर, आनंदनगर, छत्रपती चौक, मोर चौक अशा अनेक जागी चौकात कॉपी शॉपच्या नावावर तरुण-तरुणी एकत्रीत येतात आणि अश्लिल वर्तन करतात याची माहिती समोर आल्यानंतर पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी नांदेड शहरातील मोर चौक, अंबिका मंगल कार्यालयाजवळच्या कॉफी शॉपवर धाड टाकली. त्या ठिकाणी कॉफी शॉपच्या नावावर गुडूप अंधार असलेल्या छोट्या-छोट्या कक्षांमध्ये अश्लिल वर्तन सुरू होते. धाड टाकली त्याप्रसंगी पोलीसांना चार जोडपे त्यांना भेटले. पुढील कार्यवाहीसाठी ते चार जोडपे आणि कॉफी शॉप मालक भाग्यनगर पोलीसांकडे देण्यात आले आहेत.शहरात कोठेही असे अश्लिल प्रकार घडत असतील तर पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी केेले आहे.
