नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाला हिंगोली गेट जवळून उचलून त्याला महाराणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबवून त्याला मारहाण करून त्याच्याकडून 2 हजार रुपये लुटल्याचा प्रकार वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
चांदु लक्ष्मण नरबागे (33) रा.मुजळगा ता.देगलूर ह.मु.सिडको नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.29 जुलैच्या सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास ते आणि त्यांचे मित्र आपले काम संपवून घरी जात असतांना हिंगोली गेटजवळी पांपटवार यांच्या किराणा दुकानाजवळ चार जणांनी त्यांना घेरले आणि त्यांना नवीन मोबाईल घेवून दे म्हणत मारहाण केली. त्या चौघांनी चांदु नरबागे आणि रनजित कांबळे यांना जबरदस्तीने बसवून बाफना ब्रिजसमोर महाराणा प्रताप चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबवून पुन्हा मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील 2 हजार रुपये घेवून पळून गेले. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 366, भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 314/2023 दाखल केला आहे. तात्पुरर्ते पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जयश्री गिरे यांच्याकडे अधिक तपास देण्यात आला आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकाला पळवून नेऊन 2 हजारांची लुट