नांदेड(प्रतिनिधी)-आता सेवानिवृत्तीनंतर आपल्या कुटूंबाकडे जास्त लक्ष द्या कारण सेवा काळात साहेबांची भिती होती आता तुम्ही स्वत:च साहेब झालात त्यामुळे कुटूंबाला न दिलेल्या वेळाची अनुशेष भरून काढा अशा शब्दात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झालेल्या दोन पोलीस उपनिरिक्षक, एक ग्रेड पोलीस उपनिरिक्षक, चार सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि सहा पोलीस अंमलदारांना सन्मानपुर्वक निरोप दिला.
पोलीस सेवाकाळात तुम्हाला साहेबांची भिती होती. त्यामुळे कुटूंबाला आवश्यक असलेला वेळ देता आलेला नाही. आता तो अनुशेष भरून काढाला आणि कुटूंबासोबत आनंदाने जीवन जगा. गरज पडल्यास मी आणि नांदेड पोलीस दल तुमच्या कोणत्याही अडचणीसाठी तयार आहोत अशा शब्दात आपल्या सेवानिवृत्त अधिकारी आणि अंमलदारांना श्रीकृष्ण कोकाटे यांनी निरोप दिला. या कार्यक्रमात पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे, जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पोलीस उपनिरिक्षक माया भोसले यांच्यासह अनेक शाखाचे अधिकारी, पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी हजर होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. पोलीस कल्याण विभागातील पोलीस अंमलदार राखीव कसबे यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.सर्व सेवानिवृत्तांना मान्यवरांनी सहकुटूंब सन्मान केला.
आज सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. पोलीस उपनिरिक्षक मुनिरोद्दीन बशीरोद्दीन सय्यद (पोलीस ठाणे इतवारा), कृष्णा रामभगत काळे (पोलीस नियंत्रण कक्ष), ग्रेड पोलीस उपनिरिक्षक प्रल्हाद रामजी बनसोडे (पोलीस मुख्यालय), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विलास खोब्राजी लोखंडे (विमानतळ), अहमद हुसेन शेख (नियंत्रण कक्ष), भगवान श्रीहरी मुसळे(नांदेड ग्रामीण), गुलाब बंडू आडे(तामसा), पोलीस अंमलदार गोविंद गंगाराम चंदनफुले (मुखेड), कैलास लक्ष्मण मुनेश्र्वर(भाग्यनगर), छगन धर्मा जाधव(माहूर), सुधीर गंगाराम ढेंबरे(भाग्यनगर), मोहन संभाजी नव्हाटे(भोकर), विनोद दामोधरराव कटकमवार(बिनतारी संदेश).
सेवानिवृत्तीनंतर कुटूंबाचा वेळेचा अनुशेष भरून काढा-श्रीकृष्ण कोकाटे