29 जुलै रोजी झालेल्या मारहाण प्रकरणातील युवकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)- 29 जुलै रोजी रात्री 11 वाजता वसरणी येथे तिन जणांनी एका 22 वर्षीय युवकाच मारहाण केली. गंभीर जखमी असलेल्या राजेश शास्त्री हा युवक काल रात्री मरण पावल्याने हा गुन्हा आता खूनाचा झाला आहे.
मंगेश विठ्ठल डोकलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मागील भांडणाचा राग मनात धरुन अजय बळीरामसिंह ठाकूर याने तलवारीने जिवेमारण्याचा उद्देश डोक्यात ठेवून हल्ला केला. त्यावेळी त्यांचे मित्र अनिकेत राजेश शास्त्री हे मध्यस्थी करत असतांना अजय बळीरामसिंह ठाकूरसह असलेल्या छकुल्या आणि एक नाव माहित नसलेला युवक या तिघांनी जोरदार हल्ला अनिकेत राजेश शास्त्रीवर पण केला. जखमी अवस्थेत मंगेश डोकलवार यांच्या तक्रारीवरुन तिन जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 551/2023 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक चव्हाण हे करीत आहेत. या जखमी दोघांवर उपचार सुरू असतांना काल रात्री अनिकेत राजेश शास्त्रीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या गुन्ह्यात खूनाचे भारतीय दंड संहितेतील कलम 302 वाढणा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *