
नांदेड(प्रतिनिधी)-आज लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्यासह अनेक अधिकारी आणि अंमलदारांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना कार्यालयात आणि पुतळ्या जवळ जावून पुष्पअर्पण करून अभिवादन केले.
आज 1 ऑगस्ट साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक सुनिल निकाळजे, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठे, जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागांचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. सर्वांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पअर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार संजय सांगवीकर, शामका पवार आणि विनोद भंडारे यांनी चांगल्या प्रकारे केले.

महानगरपालिकेतर्फे “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे”यांना अभिवादन

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे दि.१ ऑगस्ट २०२३रोजी सकाळी १०.०० वाजता “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे” यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विद्युत भवन,नांदेड येथील पुतळ्यास मा. आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त (प्रशासन)निलेश सुंकेवार,उपायुक्त (महसूल) डॉ.पंजाब खानसोळे, मनपाचे अधिकारी,विभागप्रमुख ,पदाधिकारी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.