नांदेड(प्रतिनिधी)-प्रेम संबंधातून पळून गेल्यानंतर एका 35 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार मौजे कार्ला तांडा ता.उमरी येथे 26 जुलै रोजी घडला आहे.
सुभाष शंकर चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अविनाश शंकर चव्हाण या त्यांच्या लहान भावाचे प्रेम संबंध एका महिलेसोबत होते. म्हणून ते दोघे पळून गेले होते. काही दिवसांनी परत आल्यानंतर विनायक किशन चव्हाण (55), साहेबराव कंठीराम राठोड(54), प्रकाश कंठीराम राठोड (40) आणि विनायक जावई भिकु (43) अशा चौघांनी मिळून अविनाश शंकर चव्हाण (35) यास कोयत्याने मारुन जखमी केले. त्यानंतर अविनाश चव्हाणच्या गुप्तअंगावर, पाठीवर, पायावर, छातीत दगडाने आणि रॉडने ठेचल्यामुळे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. उमरी पोलीसंानी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 नुसार गुन्हा क्रमांक 199/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.आर.कऱ्हे हे करीत आहेत.
प्रेम संबंधानंतर पळून गेलेल्या प्रेमीचा खून