
नांदेेड(प्रतिनिधी)-आज शहरात आणि जिल्ह्यात सर्वत्र साहित्यरत्न, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी झाली.
आज साहित्यरत्न, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये झेंडावंदन करण्यात आले. तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी शहरातील विविध भागातून अनेक मिरवणुका निघाल्या. वाजत गाजत शाहिर अण्णाभाऊ साठे यांची भक्त मंडळी अण्णाभाऊ साठे चौकात पोहचली आणि तेथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून आपले श्रध्दासुमन अर्पित केले. रात्री उशीरापर्यंत या मिरवणूका सुरू होत्या.
शहरातील प्रितीनगर भागात इतवाराचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी इतवाराचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब स्वामी, पोलीस उपनिरिक्षक शेख असद, रमेश गायकवाड, वास्तव न्युज लाईव्हचे संपादक कंथक सुर्यतळ, प्रितीनगरमधील किरण पारधे आणि त्या भागातील नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
