नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका 19 वर्षीय युवकाकडून एक बनावटी गावठी पिस्टल आणि दोन जीवंत काडतूसे पकडली आहेत. हा युवक गोपाळचावडीचा राहणारा आहे.
1 ऑगस्ट रोजी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील लातूरफाटा येथे एका युवकाकडे बनावट पिस्टल आहे अशी माहिती मिळाली. त्यांनी आपली सहकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव केंद्रे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, सुरेश घुगे, मोतीराम पवार, देवा चव्हाण, महेश बडगु, मारोती मोरे, ज्वालासिंग बावरी आणि गंगाधर घुगे यांना तिकडे पाठवले. या पथकाने तेथे नागेंद्र उर्फ दत्ता श्रीहर भारती (19) रा.जिंदमनगर, गोपाळचावडी यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल 30 हजार रुपये आणि दोन जिवंत काडतूस 2 हजार रुपयंाचे असा मुद्देमाल जप्त केला. पडलेला युवक दत्ता उर्फ नागेंद्र भारती विरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने एका युवकाकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतूसे पकडली