नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोगाव शिवारात तिन जणांनी एका दुचाकी स्वाराला चाकुचा धाक दाखवून 73 हजार 930 रुपयांचा ऐवज लुटला आहे. तसेच बिद्राळी रस्ता धर्माबाद येथील बारमधून चोरट्यांनी 36 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
ज्ञानेश्र्वर देविदास बाळके हे 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता स्वमान फायनान्स प्रा.लि.या कंपनीचे मालेगाव आणि सावरगाव येथून खातेदारांकडून 55 हजार रुपये रोख रक्कम जमा करून भोगावकडे जात असतांना भोगाव शिवारातील खंडेराव भाऊराव हाके यांच्या शेताजवळ 3 चोरटे मोटारसायकलवर आले आणि ज्ञानेश्र्वर बाळकेच्या दुचाकीला धडक देवून थांबवले. चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून 55 हजार रुपये रोख रक्कम आणि टॅब असा एकूण 73 हजार 930 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक हनमंत गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
दत्ता नरसा गौंड यांचे बिद्राळी रस्त्यावर मधुबन बार आहे. 31 जुलै च्या रात्री ते 1 ऑगस्टच्या पहाटे दरम्यान चोरट्यांनी त्यांचे बार फोडून 33 हजार 800 रुपये रोख रक्कम 1800 रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या बॉटल्या तसेच मारोती राचप्पा छपरे यांच्या शेतातून आणि नारायण जगीटवार यांच्या शेतातून चोरी करून एकूण 36 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कुमरे अधिक तपास करीत आहेत.
भोगाव शिवारात जबरी चोरी; धर्माबादमध्ये बिअर बार फोडून चोरी