नांदेड(प्रतिनिधी)-होळातून खेकडे पकडण्यासाठी जातांना हनुमंत सुर्यकांत पाटील यांच्या ऊसाच्या शेतात लावलेल्या विद्युत तारांना चिटकून दोन युवकाचा मृत्यू झाला आहे. मुक्रामाबाद पोलीसांनी या बाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पुंडलीक व्यंकट नागरवाड रा.सतनुर ता.मुखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.31 जुलै रोजी रात्री 9.30 वाजेच्यासुमारास संभाजी पुंडलिक नागरवाड (21) आणि शिवाजी रामदास सुरूमवाड हे दोघे मित्र होळामध्ये खेकडे पकडण्यासाठी जात असतांना हनमंत सुर्यकांत पाटील यांनी ऊसाच्या शेतात जनावरे जाऊ नयेत म्हणून लावलेल्या विद्युत तारेमुळे झटका लागून संभाजी पुंडलिक नागरवाड आणि शिवाजी रामदास सुरूमवाड या दोघांचा मृत्यू झाला आहे. शेत मालक हनुमंत सुर्यकांत पाटील यांच्याविरुध्द मुक्रामाबाद पोलीसांनी सदोष मनुष्यवध या सदराखाली भारतीय दंड संहितेच्या कलम 304 नुसार गुन्हा क्रमांक 159/2023 दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक काळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
शेतात जनावरे जाऊ नये म्हणून लावलेल्या विद्युत तारांना चिटकून दोन युवकांचा मृत्यू