नांदेड(प्रतिनिधी)-सिडको भागातील धनुष्यबान कमान समोर असलेल्या एका सराफ दुकानदाराचे जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त सोने-चांदी ठेवलेली बॅग चोरट्यांनी पळवल्याचा प्रकार आज सकाळी 10 वाजेच्यासुमारास घडला आहे.
सिडको भागात प्रशांत प्रभाकर डहाळे यांची धनुष्यबान कमानीजवळ गुरूकृपा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आज सकाळी ते आपल्या दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एस.2351 वर बसून दुकानासमोर आले आणि दुचाकी उभी करून दुकान उघडण्याची सुरूवात केली. कोणी तरी चोरट्यांनी प्रशांत डाहाळेचा पाठलाग केला होता आणि त्यांची संपुर्ण माहिती जमवलेली होती असे दिसते. क्षणार्थातच दोन चोरट्यांनी त्यांच्या डिक्कीला तोडून त्यातून जवळपास 50 लाख रुपयापेक्षा जास्त किंमतीचे सोने-चांदी असेलेली बॅग चोरून पळून गेले आहेत.
घटनेची माहिती कळताच इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्यासह अनेक अधिकारी, अनेक पोलीस अंमलदार पोहचले आहेत. काही लोकांनी सांगितले की, आसपासच्या सीसीटीव्हीमध्ये या चोरीची घटना कैद झाली आहे. त्यावरून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
