नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका,नांदेड तर्फे दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता “क्रांतीसिंह नाना पाटील” यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त (प्रशासन) निलेश सुंकेवार,मुख्य लेखाधिकारी डॉ.जनार्दन पक्वान्ने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्य प्रशासकीय इमारत ,तिसरा माळा,प्रशिक्षण हॉल येथे मुख्य लेखापरीक्षक टी.एल.भिसे,सहा.आयुक्त गुलाम सादेख,अंतर्गत लेखापरीक्षक सुधीर इंगोले,अनाधिकृत बांधकाम नियत्रंण व निर्मुलन अधिकारी संभाजी कास्टेवाड, प्रकाश गच्चे , गौतम कवडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.