नांदेड(प्रतिनिधी)-विविध गुन्ह्यांसह मकोका कायद्याअंतर्गत फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी पकडून पुढील तपासासाठी पोलीस उपअधिक्षक गौहर हसन यांच्या स्वाधीन केला आहे.
पोलीस ठाणे विमानतळ येथे गुन्हा क्रमांक 80/2023 भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह मकोका कायदा जोडून त्याचा तपास सुरू आहे. यातील एक आरोपी संतोष उर्फ संत्या मेघशाम वाघमारे (33) रा.शिवनगर नांदेड हा फरार होता. दि.3 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेला त्यांच्या गुप्त माहितीदाराकडून खात्रीशिर माहिती प्राप्त झाली की, हा आरोपी संतोष उर्फ संत्या वाघी रोड आरटीओ ऑफीस परिसर भागात आहे. आपल्या मिळालेल्या माहितीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देवून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपले पथक तिकडे पाठवले. त्या ठिकाणावरून पोलीसांनी संतोष उर्फ संत्या मेघशाम वाघमारे (33) रा.शिवनगर यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द विमानतळ येथे गुन्हा क्रमांक 80/2023 तसेच नांदेड ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक 148/2023, 159/2023 आणि जालना जिल्ह्यातील पोलीस ठाणे मौजपुरी येथे गुन्हा क्रमांक 70/2023 दाखल आहे. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे आदींनी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, गणेश धुमाळ, विलास कदम, रणधिर राजबन्सी, महेश बडगु, अर्जुन शिंदे, सायबर विभागाचे पोलीस अंमलदार राजू सिटीकर आणि दिपक ओढणे यांचे कौतु केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने मकोकाचा फरार आरोपी पकडला