नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत इमारत खुला भुखंड आहे असे दाखवून 75 लाखांची फसवणूक करणाऱ्या 9 लोकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची रक्कम मोठी असल्यामुळे हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हा शाखेकडे देण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील रोहिला गल्लीत राहणारे मोहम्मद युनूस हुसेन (56) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी काही लोकांसोबत बिल्डर्सचा भागिदारी करार केला होता. त्यानुसार मेसर्स ईमिरॉल्ड डेव्हलपर्स नावाने शेत सर्व्हे नंबर 129/2/4 पीआर कार्ड नंबर 11723 हुसेन नगर नांदेड येथे भुखंड क्रमांक 1 वर ईमिरॉल्ड प्लॉझा ही इमारत तयार असतांना पीआर कार्ड क्रमांक 11723 हे मोकळे भुखंड आहे असा दाखवून त्यावरील भुखंड विक्री करून 75 लाखांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 22 ऑगस्ट 2019 ते 1 जुन 2022 दरम्यान घडला.
या गुन्ह्याच्या आरोपी सदरात नुरूनीसा बेगम मोहम्मद याकुब रा.नांदेड, मोहम्मद याकुब मोहम्मद हुसेन रा.नांदेड, मनसुरखान महेमुद खान, मोहम्मद अलीयोद्दीन अहेमद मोहम्मद सादीक अली, मोहम्मद इफ्तेखार अली सादीक अली, मोहम्मद अहेमद अली सादीक अली,मिर हिदायत अली बशारत अली सर्व रा.औरंगाबाद, मोहम्मद आयुबबारी मोहम्मद खयुम रा.नांदेड. इतवारा पोलीसांनी मोहम्मद युनूस हुसेनच्या तक्रारीवरुन या सर्व 9 आरोपींविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 471 आणि 34नुसार गुन्हा क्रमांक 236/23 दाखल केला आहे. या गुन्ह्यातील फसवणूकीची रक्कम खुप मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक उदय खंडेराय यांच्याकडे देण्यात आला आहे.
इमारत असतांना भुखंड दाखवून 75 लाखांची फसवणूक