नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयाने 13 आरोपीविरुध्द काढलेलेे अ जामीन पात्र वॉरंट एकाच रात्रीत माळाकोळी पोलीसांनी बजावले आहेत.एकाच रात्री 13 वॉरंट एकदाच बजावणाऱ्या माळाकोळी पोलीसांचे कौतुक होत आहे.
दि.2 ऑगस्ट ते 3 ऑगस्टच्या रात्री माळाकोळी पोलीसांनी एक विशेष मोहिम राबवली. लोहा न्यायालयाने 13 आरोपींविरुध्द अजामीन पात्र वॉरंट जारी केले होते. म्हणजे ते आरोपी न्यायालयात हजर होत नव्हते. त्यानुसार माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस उपनिरिक्षक मुंडे, आडे, पोलीस अंमलदार दिलीप केंद्रे, कापडे, ढेंबरे, क्षिरसागर, राठोड, चिटलवार, बोंबले, माने, शेळके आणि शेख आदींनी ही मोहिम राबवतांना 13 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच न्यायालयात हजर केले आहे.
पकडण्यात आलेले अ जामीन पात्र वॉरंटचे आरोपी पुढील प्रमाणे आहेत आत्माराम मोतीराम शिंदे, नामेदव आत्माराम शिंदे रा.हिप्परगा ता.लोहा जि.नांदेड, हनुमंत साहेबराव पोले रा.कुरळा ता.कंधार जि.नांदेड, विकास राम केंद्रे रा.उमरदरा ता.जळकोट जि.लातूर, बालाजी देवराव गुळवे, देवराव गणपती गुळवे, सुरज दादाराव पांढरे रा.रिसनगाव ता.लोहा जि.नांदेड, रावसाहेब बापूराव धुळगंडे, आशिष बापूराव धुळगंडे, बालाजी किशन दाभाडे, रा.माळेगाव यात्रा ता.लोहा जि.नांदेड, बळीराम तातेराव डोईफोडे रा.लिंबोटी ता.लोहा जि.नांदेड, राजू गोविंद चव्हाण, रा.हिराबोरी तांडा ता.लोहा जि.नांदेड, गोविंद किशन कदम रा.सावरगाव ता.लोहा जि.नांदेड असे आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, कंधारचे पोलीस उपअधिक्षक मारोती थोरात, यांनी माळाकोळी पोलीसांचे एकाच रात्रीत 13 अटक वॉरंट जारी असलेले आरोपी पकडण्यासाठी कौतुक केले आहे.
एकाच रात्रीत अजामीन पात्र वॉरंटचे 13 आरोपी माळाकोळी पोलीसांनी पकडले