नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक गावठी पिस्तुल आणि तीन जीवंत काडतूस पकडूण एका युवकावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयाने 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी जारी केलेल्या प्रेसनोटनुसार पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीतील सुशील नगर, धनेगाव येथे साईनाथ अनिल भांडे या युवकाकडे गावठी पिस्टल पकडले. त्यासोबत तीन जीवंत काडतूसे सुध्दा होती. जप्ती पंचनाम्यात या ऐवजाची किंमत 33 हजार रुपये दाखविणयात आली आहे. या युवकाला पकडूण पोलीस उपनिरिक्षक विजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदाप्रमाणे गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने त्यास 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरिक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरिक्षक प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, ज्ञानोबा कौठेकर, माधव माने, संतोष बेल्लूरोड आणि महिला पोलीस अंमलदार केंद्रे यांचे कौतुक केले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे पकडली