नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने आज 18 भारतीय प्रशासनिक अधिकाऱ्यांना (आयएएस) नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील दोन अधिकारी जाणार आहेत. एक नवीन येणार आहे.
राज्य शासनाने आज 18 आयएएस अधिकाऱ्यांना बदल्या दिल्या. त्यात 1994 ते 2020 या बॅचचे हे अधिकारी आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील प्रकल्प अधिकारी नेहा भोसले यांना जवाहर जिल्हा पालघर येथे पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी पुसद येथील कार्तीकेयन यांना पाठविण्यात आले आहे. त्या शिवाय जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले यांना महाडिस्कॉम औरंगाबाद येथे पाठविले आहे.
इतर अधिकाऱ्यांमध्ये सोनिया सेठी यांना फॉरेस्ट विभाग मंत्रालय येथे पाठविले आहे. रुपींदरसिंघ यांना महाराष्ट्र सदन नवीन दिल्ली येथे पाठविले आहे. गोरक्षा गाडीकर यांना सेरिकल्चर नागपूर येथे पाठविले आहे. अविनाश पाठक यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बीड अशी नियुक्ती दिली आहे. गुलाब आर.खरात यांना शिवसाई पुनर्वसन प्रकल्प मुंबई येथे पाठविले आहे. डॉ.प्रविणकुमार देवरे यांना ओबीसी बहुजन कल्याण पुणे येथे संचालक केले आहे.मिलिंदकुमार साळवे यांना राज्य कर विभागात सहआयुक्त करून औरंगाबाद येथे पाठविले आहे. सतिशकुमार खडसे यांना नाशिक मेट्रो डेव्हलपमेंट येथे आयुक्त करण्यात आले आहे. संजय काटकर यांना सहआयुक्त सिडको नवीमुंबई अशी नियुक्ती दिली आहे. पराग सोमन यांना झोपडपट्टी पुर्नवसन मुंबई येथे कार्यकारी अधिकारी पद दिले आहे. अनिकुमार पवार यांना वसई विरार महानगरपालिकेत पाठविले आहे. सचिन कलत्रे यांना महाराष्ट्र सीड कार्पोरेशन अकोला येथे कार्यकारी अधिकारी करण्यात आले आहे. मनोज रानडे यांना महानगरपालिका मुंबई येथे प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. मुरुगनाथम यांना गडचिरोली येथे प्रकल्प अधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे. रिचर्ड एनथान यांना प्रकल्प अधिकारी धर्णी अमरावती अशी नियुक्ती दिली आहे.
राज्यात 18 आयएएस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या; नांदेड येथून दोन जाणार एक येणार