नांदेड(प्रतिनिधी)-रिठा ता.भोकर येथील शाळेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पोषण आहार साहित्य चोरले आहे. उमरी शहरात बिअर बार फोडून चोरट्यांनी ऐवज चोरला आहे. तसेच बाफना टी पॉईंटवरील एस.पी.बारमध्ये चोरी करून दारुसह इतर ऐवज चोरीला गेला आहे. वाहेदपुर वाडी शिवारातून पशुधन चोरीला गेले आहे.
स्वातंत्र्य सैनिक भुजंगराव किन्हाळकर शाळेचे मुख्याध्यापक हणमंत निळकंठ इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जुलै ते 31 जुलै दरम्यान माध्यमिक विद्यालय रिठ्ठा येथील शाळेचे कुलूप तोडून चोरट्यांनी 8 हजार 785 रुपयांचा शालेय पोषण आहार चोरून नेला आहे.अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक देवकांबळे अधिक तपास करीत आहेत.
प्रदीप पुरभाजी गोजे यांचे नागझरी रोड उमरी येथे इंद्रप्रस्थ नावाचे बिअरबार आहे. 3 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर 2.55 ते 3.6 वाजेदरम्यान चोरट्यांनी ते बिअरबार तोडले.ते चोर 20 ते 25 वयोगटातील आहेत. त्यांनी बिअरबारच्या गल्यातील 55 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. उमरी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार भालेराव अधिक तपास करीत आहेत.
रणजितसिंघ सुरेंद्रसिंघ मनन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे बाफना टी पॉईंट येथे एस.पी.बार आहे. 2 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा व्यवस्थापक हरजितसिंघ हा झोपला असतांना त्याचा 25 हजार रुपयांचा मोबाईल आणि दारुच्या तिन बॉटल्या असा 30 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. इतवारा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार मोहन हाके अधिक तपास करीत आहेत.
श्रीराम बालाजी शेळके रा.वाहेदपुर वाडी ता.अर्धापूर जि.नांदेड यांच्या शेतशिवारातून 1 ऑगस्ट ते 2 ऑगस्टच्या रात्री कोणी तरी त्यांच्या आखाड्यावर बांधलेला 30 हजार रुपये किंमतीचा बैल चोरून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बोधमवाड अधिक तपास करीत आहेत.
शालेय पोषण चोरले; दोन बिअरबार फोडले ; पशुधन चोरी