नांदेड(प्रतिनिधी)-सांस्कृतीक मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने फेस्टीवल ऑफ लायब्ररीज-2023 मध्ये महाराष्ट्रातून 19 ग्रंथपालांना निमंत्रीत करण्यात आले आहे. त्यात नांदेड सचखंड गुरूद्वारा बोर्डातील ग्रंथपाल सौ.बबीताकौर चाहेल यांचा समावेश आहे.
दिल्ली येथील प्रगती मैदानात होणाऱ्या ग्रंथालय महोत्सवात 5 आणि 6 ऑगस्ट रोजी दोन सत्रात कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ह्या उपस्थित राहणार आहेत.दुसऱ्या दिवशी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून 19 विविध ग्रंथपालांना बोलावण्यात आले आहे. त्यात नांदेड सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या ग्रंथपाल सौ.बबिताकौर चाहेल यांचा क्रमांक लागला आहे. या दोन दिवसांच्या ग्रंथालय महोत्सवात विविध प्रदर्शन, चर्चा सत्र, वाचन संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सौ.बबीताकौर चाहेल यांच्या निवडीचे गुरूद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष सरदार भुपेंद्रसिंघ मिन्हास, सरदार गुरविंदरसिंघ बाबा, डॉ.पी.एस.पसरीचा, सध्याचे प्रशासक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कौतुक केले आहे. सौ.बबीताकौर चाहेल यांच्या कामाला पाहुन त्यांना मुख्य लिपीक पदावरुन पर्यवेक्षक पदावर पदोन्नती दिली आहे. गुरूद्वारा बोर्डाचे कर्मचारी याबाबत आनंदी आहेत.
दिल्लीच्या ग्रंथालय महोत्सवात नांदेडच्या गुरूद्वारा बोर्डातील ग्रंथपाल सौ.चाहेल यांची निवड