मुदखेड(प्रतिनिधी)-मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दी अंतर्गत मुदखेड नांदेड रस्त्यावर ईजळी लगत दोन अज्ञात मोटरसायकल स्वा रांनी मुदखेड येथील कदम ज्वेलर्स या सराफा दुकानात काम करणाऱ्या खाजगी नोकरास चाकूचा धाक दाखवून भर दिवसा लुटत रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की मुदखेड येथील कदम ज्वेलर्स येथे खाजगी नोकर म्हणून काम करणारा युवक गोविंद कचरू मुंगल रा.इजळी हे ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान नांदेड येथील होलसेल सराफा दुकान तिरुपती ज्वेलर्स येथे जाऊन सोन्या चांदीचे दागिने दिले व त्यातून मिळालेली रोख रक्कम आणि काही दागिने घेऊन ते मुदखेड कडे येत नांदेड मुदखेड रस्त्यावर ईजळी लगत कृष्णा कृषी सेवा केंद्रा समोर दोन अज्ञात इसमानी विना नंबरच्या मोटरसायकल वरून येत गोविंद मुंगल यांच्या दुचाकीला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु गोविंद मुंगल यांनी सदर दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता एका इसमाने त्याच्या जवळ असलेल्या दागिने व रोख रक्कम असलेली बॅग लंपास करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या युवकांनी चाकूचा धाक दाखवून त्यास भर दिवसात तातडीने लूट करून घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेची माहिती प्राप्त होतात घटनास्थळी पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी पोलिसांच्या लव्या जाम्यासह भेट दिली.
यामध्ये पाच लाख रुपयांच्या वर रोख रक्कम आणि जवळपास ८० हजार रुपयाची दागिने लंपास केले असल्याची माहिती प्राप्त आहे .याप्रकरणी गोविंद मुंगल यांनी मुदखेड पोलीस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.