नांदेड(प्रतिनिधी)- काल दि.4 ऑगस्ट रोजी दुपारपासून घरी नसणारे पती-पत्नी आज दाभड गावाजवळ विष पिलेल्या अवस्थेत सापडले अशी माहिती अर्धापूर पोलीसांनी दिली आहे. त्यातील पत्नीचा मृत्यू झाला असून पतीवर शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे उपचार सुरू आहे.
वसरणी गावात राहणारे कैलास बापूराव डोंगरे (40) आणि त्यांच्या पत्नी ललिता कैलास डोंगरे (38) हे दोघे काल दि.4 ऑगस्टच्या दुपारपासून घरात नव्हते. आज दि.5 ऑगस्टचा सुर्योदय उगवल्या बरोबर या दोघांचे देह दाभड गावाजवळ दिसले. माहिती मिळताच अर्धापूरचे पोलीस निरिक्षक हनमंत गायकवाड आणि त्यांचे सहकारी अधिकारी घटनास्थळी पोहचले. पाहणी केली असता पत्नी ललिता डोंगरे यांचा मृत्यू झालेला होता आणि पती कैलास डोंगरे यांचा श्वास सुरू होता. पोलीसांनी जखमी कैलास डोंगरेला शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे उपचारार्थ दाखल केले आहे. विषारी औषधाचे नाव लिहिलेल्या काही बॉटल्या डोंगरे पती-पत्नीच्या शेजारी सापडलेल्या आहेत.अर्धापूरचे पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड यांनी सांगितले की, प्रथम दर्शनी या दोघांनी विष प्राशन केले असावे असे वाटते. वैद्यकीय अहवाल आल्यावर यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल आणि कारणे शोधण्यात येतील.
पती-पत्नी विष पिलेल्या अवस्थेत दाभड जवळ सापडले; पत्नीचा मृत्यू, पतीवर उपचार