नांदेड(प्रतिनिधी)-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी-मेरा देश हे अभियान देशात सर्वत्र राबवल जात आहे. याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातही ही अभियान राबवले जाणार असून या अभियानात सरपंच, गावातील नागरीकांनी या महोत्सवात सहभाग नोंदवून लोक चळवळ निर्माण करावी अशी विनंती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण झाले आहेत. यामुळे अमृतमहोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. या एक वर्षाच्या कालावधीत अनेक कार्यक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी यावर्षी भारत देश आझाजीचे 75 वर्ष पुर्ण करत आहे. अमृतकाढ्याची सुरूवात झाली आहे. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या उपक्रमाची सुरूवात केली आहे. मेरी माटी-मेरा देश, विरोको वंदन यामध्ये आमच्या मातीमधून जन्मलेले विर ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याग दिला आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी, आर्मीचे कर्मचारी त्यांच्यासाठी हे प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये प्रत्येक ग्राम पंचायतमध्ये एक शिला लावण्यात येणार आहे.त्या शिलेमध्ये विरांचे वंदन होणार आहे. याचबरोबर त्या शिलेच्याजवळ 75 वृषांची लागवडही केली जाणार आहे. यांचा एक सेल्फीही काढला जाणार आहे. पंचप्राण पण घेणार आहोत. यासर्वांची माहिती ग्रामसेवकांना देण्यात आली आहे. त्यांच्याकडून ही माहिती घेण्यात यावी. जर ग्रामसेवकांनी ही माहिती दिली नाही तर त्या-त्या तालुक्यातील गट विकास अधिकारी यांच्याकडूून ही माहिती घ्यावी. सर्व माहिती ग्रामसेवकांना पोहचली आहे. प्रत्येक गावच्या सरपंचांना माझी विनंती आहे. यामध्ये उत्साहाने सहकार्य करावे. कोणताही उपक्रम किंेवा कोणताही प्रोजेक्ट लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, माझी वैयक्तीक विनंती आहे. की, प्रत्येक गावकऱ्याने यात सहभागी व्हावे. व अमृतकाळाची सुरूवात चांगली करावी. अमृतकाळाची सुरूवात ही 75 ब्लॉकमध्ये आहे. प्रत्येक ब्लॉकमधून माती घेवून दिल्लीला जाणार आहेत. याठिकाणी पुर्ण देशाची माती एकत्रत केली जाणार आहे. हा उपक्रम मोठा आहे आणि विषयही मोठा आहे. सर्वांनी सहभागी होवून उत्सव मोठा साजरा करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना केले आहे.
संबंधित व्हिडिओ…