नांदेड(प्रतिनिधी)-बनावट नावाचा सुर्यछाप जर्दा विकणाऱ्या चार जणांनाविरुध्द इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेली एकूण रक्कम 2 लाख 13 हजार 950 रुपये आहे.
व्ही.एच.पटेल कंपनीचे वितरक बाबुलाल गंगाशरण अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नेक्लेस रोड ईस्लामपूर येथे बनावट सुर्यछाप जर्दाची पॉकीटे तयार करून त्यात त्यांच्या कंपनीचे लोगो वापरून बनावट शिक्के मारुन तो बनावट जर्दा सुर्यछाप चाळीसगावचाच आहे असे दाखवून विक्री होत आहे. या माहितीनंतर 7 ऑगस्टच्या मध्यरात्री तेथे छापा टाकण्यात आला. फसवणूक झालेली एकूण रक्कम 2 लाख 13 हजार 950 रुपये असल्याचे तक्रारीत लिहिले आहे. या प्रकरणी 4 आरोपींची नावे या एफआयआरमध्ये नमुद आहेत. त्यांची नावे अशी आहेत. शेख मजहर शेख बाबु मियॉं (52) रा.मंडई इतवारा नांदेड, मोहम्मद फराज हुसेन मोहम्मद मिराजोद्दीन (19) रा.पिवळी बिल्डींगजवळ नांदेड, शेख जाकेर शेख अमीर (40) रा.मदीनानगर नांदेड सय्यद वसीम सय्यद सलीम रा.देगलूर नाका नांदेड अशी आहेत.
इतवारा पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471, 482, 484, 486, 487, 34 आणि कॉपीराईट कायदा कलम 51 आणि 63 नुसार गुन्हा क्रमांक 247/2023 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब स्वामी अधिक तपास करीत आहेत.
बनावट सुर्यछाप जर्दा विक्री करून 2 लाख 13 हजार 950 रुपयांची फसवणूक