आदिवासी दिनानिमित्त भोसी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुर्वेदिक वनस्पती वृक्ष लागवड 

भोकर(प्रतिनिधी)- दि. ९ ऑगस्ट ” जागतिक आदिवासी दिन ” निमित्त नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी ता.भोकर येथे आयुर्वेदिक वनस्पती उद्यान ( आयुष उद्यान ) चे उद्घाटन करण्यात आले.

आयुर्वेदिक वनस्पती कोरफड, हिरडा, आवळा, जांभूळ, दगडी , शेवगा, तुळस ईत्यादी औषधी वनस्पतीची वृक्ष लागवड करण्यात आली.

भोकर तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी, किनी, मोघाळी, मातूळ अंतर्गत १७ उपकेंद्रात १०३० आयुर्वेदिक औषधी वनस्पती वृक्ष लागवड करण्यात आली आहे व आजुन जवळपास १००० आयुर्वेदिक औषधी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे अशी माहिती भोकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ दीपक कदम यांनी दिली आहे.

 

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी भोकर डॉ दीपक कदम, प्राथमिक आरोग्य केंद्र भोसी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ जीवन राठोड, डॉ सुर्यवंशी, डॉ कौठेकर, आरोग्य सहाय्यक एम.ऐ. सय्यद, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी कैलास लंकलवाड, औषध निर्माण अधिकारी श्री जोशी आदी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *