नांदेड(प्रतिनिधी)-2021 मध्ये घडलेल्या गुन्ह्याची नोंद पोलीस विभागाने घेतली नाही म्हणून पिडीत महिलेने न्यायालयात दाद मागितल्यानंतर आठव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पिडीतेच्या सासरच्या चार जणांविरुध्द जिवघेणा हल्ला यासह कौटूंबिक छळ या सदरात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता 7 ऑगस्ट 2023 रोजी भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
एका 22 वर्षीय विवाहितेने आपला नवरा गुरबचनसिंघ टहेलसिंघ सिध्दु (26), टहेलसिंघ फत्तेसिंघ सिध्दु (52), हरजितकौर टहेलसिंघ सिध्दु (56), हरमितसिंघ टहेलसिंघ सिध्दु (22) यांच्याविरुध्द तक्रार दिली की, 13 डिसेंबर 2021 रोजी हुंड्यासाठी साडे पाच तोळे सोन्याचे ब्रॉसलेट आणि इतर वस्तु असा 4 लाख 50 हजारांचा ऐवज देवून माझे लग्न झाले. लग्नानंतर दोन महिन्यांनी 2 लाख रुपयांची मागणी झाली. त्यानंतर मे 2022 मध्ये मला माहेरी सोडून दिले. त्यानंतर तीन बैठका झाल्या. मला समजावून परत पाठवले. त् यानंतर सासु व पती मला काठीने मारहाण करणे, चिमटे घेणे, पोळवणे असे काम करून मला त्रास देत होते. नोव्हेंबर 2022 मध्ये मी माहेरी आले पुन्हा नवऱ्याने आता मी चांगला राहिले असे सांगून घेवून गेले.
दि.1 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता माझे पतीने मला मारहाण केली, माझ्या छातीवर बसून तोंडात टॉवेल कोंबून गळा दाबू लागले. त्यावेळी सासु म्हणाली की, हिला जाळून टाक. दिर बाहेर कोणी येत आहे यावर नजर ठेवत होता. मी कशी वाचून वडीलांना फोन केला आणि त्यांच्यासोबत गेले. माझे वडील आले व तेथून गेले. तसेच माझ्या सासरच्या मंडळींचे सर्व ऑडीओ,व्हिडीओ तयार करून ठेवत होते आणि मला सांगत होते की, आम्ही सर्वांना दाखू. पोलीसांकडे या बाबीची दखल झाली नाही तेंव्हा पिडीत महिलेने न्यायालयात ॲड. यदूपत अर्धापूरकर, त्यांचे सहकारी ॲड. रामसिंघ मठवाले यांच्यावतीने फौजदारी खटला क्रमांक 2945/2023 दाखल करून न्याय मागितला. आठव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी भाग्यनगर पोलीसांना आदेश दिला. त्यानुसार भाग्यनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 498(अ), 323, 34 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
एका पिडीतेला न्यायालयाने आधार दिल्यानंतर गुन्हा दाखल