नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड श्री.हजुर साहिब येथे जमा असलेल्या सोन्याबद्दल माहिती विचारल्यानंतर ती माहिती तुम्ही पुर्ण अस्पष्टपणे मागितली आहे असे सांगून तो अर्ज निकाली काढण्यात आला. त्यानंतर गुरुद्वारा बोर्डाचे माहिती अधिकारी आणि अपीलय अधिकारी यांना आरोपी करावे आणि त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. सध्या हे प्रकरण माहिती अधिकारी आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे प्रलंबित आहे.पण खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व प्रकरण सचखंड श्री हजुर साहिब यांच्यासमोर दान दिलेल्या सोन्याबद्दलची आहे. हे सोने जवळपास 50 किलो आहे म्हणे.
नांदेड येथील सरदार जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी 13 जानेवारी 2023 रोजी एक माहिती अर्ज देवून गुरूद्वारा बोर्डाला माहिती मागितली की, गुरुद्वारा प्रशासक डॉ.टी.एस.पसरीचा यांनी शासनाला पाठविलेल्या अहवालाची प्रत द्यावी पण त्याची माहिती देण्यात आली नाही. अपीलीय अधिकाऱ्यांनी सुध्दा ही माहिती दिली नाही. सध्या हे प्रकरण माहिती अधिकार आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यानंतर जगदिपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी पोलीस निरिक्षक वजिराबाद यांना अर्ज दिला. पण त्यांनी तो अर्ज घेतला नाही म्हणून तो अर्ज नोंदणीकृत पोस्टाद्वारे नंबरदार यांनी पाठवला.
अद्यापही माहिती मिळालेली नाही. पण खात्रीलाय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.पी.एस.पसरीचा यांनी एक गुप्त पत्र 25 ऑगस्ट 2022 रोजी अतिरिक्त मुख्य सचिव महसुल व वन विभाग यांना पाठविले आहे. त्या पत्रात पंचप्यारे साहिबानची परवानगी न घेता गुरुद्वारा बोर्डाच्या कोणी तरी सदस्याने(त्याचे नाव कळले नाही) सचखंड श्री हजुर साहिब येथे जमलेल्या सोन्याची मोजणी करायला लावली. हा अधिकारच त्याला नव्हता याची चौकशी व्हावी. प्राप्त माहितीनुसार सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. परंतू अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही ही चौकशी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत होत आहे. त्यांचे अधिकारी यांनी सोन्याशी संबंधीत कागदपत्रे तपासली आहे अशी पण माहिती प्राप्त झाली आहे.
डॉ.पी.एस.पसरीचा यांच्या पत्राने सचखंड श्री हजुर साहिब येथील सोन्याची चौकशी सुरू