नांदेड(प्रतिनिधी)-दि.7 ऑगस्ट रोजी स्वामी समर्थ मंदिर मनगपुरा येथून स्कुटीवर आलेल्या तीन जणांनी एकूण 5 तोळे सोन्याचे दागिणे आणि 2 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 55 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
कोसमेट ता.किनवट येथील वैशाली अरुण पाटील या पंचायत समिती हिमायतनगर येथे विस्तार अधिकारी असलेल्या अरुण पाटील यांच्या पत्नी आहेत. दि.7 ऑगस्ट रोजी मगनपुरा येथील श्री.स्वामी समर्थ मंदिर येथे त्यांचे वडील कोंडीबाराव शिरफुले असे सोबत गेले होते. प्रसाद घेण्यासाठी मंदिराबाहेर थांबले असतांना तीन जण स्कुटीवर आले आणि त्यांनी सोन्याचे मिनी गंठण 10 ग्रॅम वजनाचे किंमत 10 हजार रुपये, सोन्याचे मंगळसुत्र 2 ग्रॅम वजनाचे किंमत 2 हजार रुपये, सोन्याचे मोठे गंठण 30 ग्रॅम वजनाचे किंमत 30 हजार रुपये, पर्समधील सोन्याचे झुमके 5 ग्रॅम वजनाचे किंमत 5 हजार रुपये, पर्समधील लहान बाळाची सोन्याची लॉकेट 3 ग्रॅम वजनाची किंमत 5 हजार रुपये असा एकूण 5 तोळे सोन्याचा ऐवज जुना वापरता असल्याने किंमत 50 हजार रुपये अशी फिर्यादीत लिहिली आहे. वैशाली पाटील यांच्या पर्समध्ये या 5 तोळे सोन्याशिवाय 2 हजार रुपये रोख रक्कम आणि 3 हजार रुपयांचा मोबाईल होता.
शिवाजीनगर पोलीसांनी तीन अज्ञात आरोपींविरुध्द भारतीय दंडसंहितेच्या कलम 392,34 नुसार गुन्हा क्रमांक 252/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज उलब्ध आहे. ज्यामध्ये ते तीन चोरटे स्कुलवर पळून जातांना दिसत आहेत.
वाचकांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही फुटेज जोडले आहे.
.