# हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी
# जिल्हाधिकारी यांना दिले लेखी निवेदन
नांदेड ( प्रतिनिधी )- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील धडाडीचे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आ. किशोर पाटील यांच्या समर्थकांनी केल्याच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड आणि डिजिटल मीडिया परिषद नांदेडच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी ( दि. 10 ऑगस्ट ) दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच आ. किशोर पाटील आणि त्यांच्या हल्लेखोर समर्थकांवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी या मागण्याचे लेखी निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना देण्यात आले. या निदर्शने आंदोलनात नांदेड शहर व जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी, विभागीय संघटक प्रकाश कांबळे, सदस्य सुभाष लोणे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, जिल्हा सरचिटणीस राम तरटे, समन्वयक रविंद्र संगनवार, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे, डिजिटल मिडियाचे जिल्हाध्यक्ष दिलीप शिंदे, जिल्हा सरचिटणीस संघरत्न पवार,महानगराध्यक्ष शिवराज बीच्चेवार, उपाध्यक्ष प्रल्हाद लोहकरे, सचिव सुरेश काशिदे, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर, सुर्यकांत सोनखेडकर, नरेश दंडवते, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण खंदारे,कमलाकर बिरादार, किरण कुलकर्णी, प्रशांत गवळे, श्याम कांबळे, गोविंद करवा,गंगाधर गच्चे, शिवाजी शिंदे, ॲड. मो. शाहेद, हैदर अल्ली, गजानन कानडे, सुरेश आंबटवाड, यशपाल भोसले, पंडित वाघमारे, किरण कांबळे, प्रदीप घुगे, किशोरकुमार वागदरीकर, प्रभाकर लखपत्रेवार, प्रवीणकुमार देशमुख, दिपंकर बावस्कर, राजकुमार कोटलवार, बजरंग संगनवार, ज्ञानेश्वर सूनेगावकर, शिवाजी फुळवळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.