नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंत्रीनगर भागात एका महिलेच्या गळ्यातील 70 हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावण्यात आले आहे. विष्णुपूरी भागात एक घर फोडून चोरट्यांनी 37 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. धर्माबाद आणि भोकर शहरात 70 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
गणेशनगर विस्तारीत भागात राहणाऱ्या महिला वंदना राजेश कदम या 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जागृत हनुमान मंदिर नांदेड येथे बीसीची मिटींग सपवून घराकडे पायी जात असतांना त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, 70 हजार रुपये किंमतीचे हिसकावून पळून गेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक सिंघनवाड अधिक तपास करीत आहेत.
शुंभाकर मनोज जन्नावार या विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार ते विष्णुपूरी येथील एका मित्रासोबत एकाच रुमध्ये राहतात. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ते आपल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेले असतांना त्यांच्या रुमचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी संगणक टॅब आणि रोख रक्कम असा 37 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांचाळ अधिक तपास करीत आहेत.
धर्माबाद येथील संभाजी रामचंद्र शिंदे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.पी.7847 दि.6-7 ऑगस्टच्या रात्री चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 40 हजार रुपये आहे. धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार कुमरे अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथून 9 ऑगस्टच्या सकाळी 7.30 ते 10 वाजेदरम्यान जितेंद्र प्यारेलाल चव्हाण यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जी.7312 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कानगुले अधिक तपास करीत आहेत.
महिलेच्या गळ्यातील गंठण तोडले;एक घरफोडी; दोन दुचाकी चोऱ्या