नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांच्यावतीने प्रभाग क्रं.18 मधील भजनी मंडळास लागणारे साहित्य भेट देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून नेहमीच समाजकार्यात पुढाकार घेवून बंटी लांडगे हे सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. प्रभाग क्रं.18 मध्ये एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास रात्र जागण्यासाठी भजन पार्टी लावली जाती. परंतू या भजनी मंडळाकडे आवश्यक असणारे साहित्य जूने झाले होते ही बाब बंटी लांडगे यांच्या निदर्शनास आल्यानंतर भजनी मंडळाच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा करून भंजनी मंडळास कोणकोणते साहित्य लागतात व त्यासाठी किती खर्च येईल याची माहिती घेतली व सर्व साहित्य देण्याचे आश्वासन दिले होते. दि.10 ऑगस्ट रोजी बंटी लांडगे यांच्या निवासस्थानी भजनी मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांना बोलावून त्यांना भजनाचे साहित्य सुपूर्द केले. यावेळी भजनी मंडळाचे ज्येष्ठ अध्यक्ष मधुकर हनमंते, चांदू पंडीत, अशोक हिंगोले, सुदर्शन राजभोज, भालचंद्र गवारे, दिपक पंडीत, गिरधरी गोडबोले, महेंद्र गोडबोले, राजु वंजारे आदिंची उपस्थिती होती. दरम्यान या सामाजिक कार्याबद्दल बंटी लांडगे यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.