नांदेड(प्रतिनिधी)-मौजे उस्माननगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 79 हजार 25 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
शुभम शिवराज पोटजळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 ऑगस्टच्या रात्री 10 ते 10 ऑगस्टच्या पहाटे 3 वाजेदरम्यान त्यांचे उस्माननगर येथील घरात त्यांचे आई-वडील, बहिण आणि ते हॉलमध्ये झोपले असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या चॅनलगेटचे कुलूप तोडून घरातील बेडरुमची कडीकोंडी तोडली आणि बेडरुममधील कपाट फोडले. त्यातील सोन्याचे नेकलेस, कानातील झुंबर, कानातील फुल, सोन्याचा ओम असा 22.49 ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत 1 लाख 9 हजार 25 रुपयांचे आणि 70 हजार रुपये रोख असा 1 लाख 79 हजार 25 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यात सुध्दा जुने वापरते असे लिहुन 22.49 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 9 हजार 25 रुपये दाखविण्यात आलेली आहे. उस्माननगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा क्रमांक 116/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास उसमाननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक पल्लेवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
उस्माननगर येथे घरफोडून 1 लाख 80 हजाराचा ऐवज लंपास