गुरूद्वारा बोर्डाच्या निवडणुकीसाठी अवमान याचिका दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाच्या निवडणुकीची मर्यादा संपल्यानंतर त्या संदर्भाने उच्च न्यायालयाचया औंरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली. याचिकेतील आदेशाचा अवमान झाला. म्हणून अवमान याचिका दाखल झाली. त्या अवमान याचिकेत आज 10 ऑगस्ट रोजी न्यायमुर्ती आर.जी. अवचट आणि न्यायमुर्ती संजय देशमुख यांनी महसुल आणि वनविभागाच्या सचिवांना नोटीस जारी केली असून 14 सप्टेंबर 2023 या रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.
नांदेड येथील गुरूद्वारा बोर्डाच्या सदस्यांची मुदत संपून दीड वर्ष झाले आहे. पण निवडणुक प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. या संदर्भाने जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी शासनाला निवडणुक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी सांगावे अशा आशयाची याचिका क्रमांक 1005/2022 दाखल केली. ही याचिका ऍड. म्रिगेश नरवाडकर यांनी दाखल केली होती. त्या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन झाले नाही म्हणून अवमान याचिका क्रमांक 511/2023 दाखल करण्यात आली. या याचिकेत आज ऍड.म्रिगेश नरवाडकर यांनी युक्तीवाद केला. तेंव्हा न्यायालयाने या प्रकरणात महसुल व वन विभागाचे सचिव यांना नोटीस जारी केली असून पुढील सुनावणी 14 सप्टेंबर 2023 रोजी निश्चित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *