नांदेड(प्रतिनिधी)-एका 45 वर्षीय ट्रक चालकावर फेमस फंक्शन हॉल देगलूर नाका समोर 9 ऑगस्ट रोजी दुपारी जिवघेणा हल्ला झाला. याबाबत इतवारा पोलीसांनी दोन जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 307 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दवाखान्यात उपचार घेणारे सय्यद इमरान सय्यद उस्मान (45) व्यवसाय ट्रक चालक रा.एकबालनगर धनेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.9 ऑगस्ट रोजी दुपारी 3.40 ते 4 वाजेदरम्यान महेबुब रसुल आणि मुसदीक महेबुब दोघे रा.मिलत्तनगर यांनी डिझेल टाकीचे पैसे का दिले नाही म्हणून वाद घातला आणि खंजीरच्या सहाय्याने त्यांच्या डोक्यात, पाठीवर जखमा करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घटना घडताच पोलीस उपअधिक्षक सुशीलकुमार नायक, सहाय्यक पोलीस निरिक्षक जाधव, चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांनी घटनास्थळी भेट दिली. आणि गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला.
देगलूर नाका परिसरात एका व्यक्तीवर जिवघेणा हल्ला