नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाकडून एक गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका युवकाला पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे पकडली आहेत.
11 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार तांडा बार समोर एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचे नाव अर्जुन राधेशाम शर्मा (31) रा.काळजीटेकडी जवळ जुना मोंढा नांदेड ह.मु.इंदौर(मध्यप्रदेश) असे आहे. त्याच्याकडे 30 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तुल आणि 1800 रुपये किंमतीची तीन जीवंत काडतुसे सापडली. स्थानिक गुन्हा शाखेच्या दुसऱ्या एका पथकाने भगवान बाबा चौकात गणेश केरबा बोधले (32) रा.फत्तेजंगपुर, भगवानबाबा चौकाजवळ नांदेड यास पकडले. त्याच्याकडे सुध्दा एक गावठी पिस्तुल 30 हजार रुपये किंमतीचे आणि 18 रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतुस सापडले. या दोघांविरुध्द अनुक्रमे वजिराबाद आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यामुळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे आदींनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सहाय्यक पोलीस निरिक्षक माधव केंद्रे, पोलीस अंमलदार सुरेश घुगे, मोतीराम पवार, रणधिर राजबन्सी, विलास कदम, गणेश धुमाळ, महेश बडगु, ज्वालासिंग बावरी, गजानन बैनवाड आदींचे कौतुक केले आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन युवकांना दोन पिस्टल आणि सहा जीवंत काडतुसे पकडली