नांदेड(प्रतिनिधी)-इमारत असतांना खुला भुखंड आहे असे दाखवून 75 लाखांची फसवणूक करणाऱ्या 9 जणांविरुध्द 3 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेने औरंगाबाद येथून एकाला पकडून आणले आहे. आज 12 ऑगस्ट रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्या व्यक्तीस दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
औरंगाबाद येथील मोहम्मद युनूस हुसेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड येथे काही लोकांच्या भागिदारीमध्ये त्यांनी शेत सर्व्हे नंबर 129/2/4 पीआर कार्ड नंबर 11723 हुसेननगर नांदेड येथे भुखंड क्रमांक 1 वर इमीरॉल्ड प्लॉझा ही इमारत असतांना पीआरकार्ड नंबर 11723 हे मोकळे भुखंड आहे म्हणून नुरूनिसा बेग मोहम्मद याकुब, मोहम्मद याकुब मोहम्मद हुसेन, मनसुर खान महेमुद खान, मोहम्मद अलीयोद्दीन अहेमद मोहम्मद सादीक अली, मोहम्मद इफ्तेखार अली सादीक अली, मोहम्मद अहेमद अली सादीक अली, मिर हिदायत अली मशारत अली हे सर्व रा.औरंगाबाद आणि मोहम्मद आयुब बारी मोहम्मद खयुम रा.नांदेड यांनी मिळून फसवणूक केली. त्यानुसार इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 236/2023 दाखल करण्यात आला.
गुन्ह्यातील फसवणूकीची रक्कम जास्त आहे म्हणून हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवराज तुगावे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. आर्थिक गुन्हा शाखेने या प्रकरणातील आरोपी मनसूरखआन निमगाव (68) रा.सिल्क मील कंपाऊंड औरंगाबाद यास पकडून आणले. आज एस.आर.तुगावे, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार बालाजी पवार,सतीश वंजारे यांनी या पकडलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी..
https://vastavnewslive.com/2023/08/04/इमारत-असतांना-भुखंड-दाखव/