भागवत मुधोळ यांच्यासह त्यांच्या टिमचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव

नांदेड(प्रतिनिधी) -नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मेडा अंतर्गत पीएम-कुसुम योजनेत सौर कृषी पंप मिळविण्यासाठी भागवत मुधोळ व त्यांच्या टिमने मदत केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत जीके एनर्जी यांच्या तर्फे थायलंड येथे त्यांचा व त्यांच्या टिमचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.
महाकृषी ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यात योजना राबवण्यात येत आहे  कंपनीने महाराष्ट्रातील जिल्हातील उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या इन्स्टॉलर यांना थायलंड येथे एका शानदार कार्यक्रमात नांदेड जिल्हातील भागवत मुधोळ,  दिनेश  मुधोळ, भागवत  मुधोळ, वैभव मुधोळ, सचिन मुधोळ  दुसरा क्रमांकाचा  पुरस्कार कंपनीचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल काबरा ,   मेहुल शहा, अंकुश जाधव यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
जीके एनर्जी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी पीएम कुसुम  उपक्रमांतर्गत सौर कृषी पंप बसवणारी तिसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.  भारतात सौर कृषी पंप स्थापित करण्यात कंपनीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे त्यांना या प्रतिष्ठित स्थानावर नेले आहे.  कंपनीने देशभरात सौर कृषी पंप वापरण्याच्या पद्धतीत मोठी क्रांती घडवून आणली आहे
हा पुरस्कार मिळाल्यावर  भागवत मुधोळ यांनी जीके एनर्जी आणि त्यांच्या यशाचा अविभाज्य घटक असलेल्या शेतकरी या दोघांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी आपल्या प्रवासात शेतकरी आणि जीके एनर्जीची निर्णायक भूमिका मान्य केली आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय त्यांचे यश शक्य झाले नसते यावर भर दिला.  जीके एनर्जी ध्येय शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे हे आहे, कंपनीच्या पाठिंब्यामुळे सौर कृषी पंप बसवणे शक्य झाले आहे जे शेतकर्‍यांना वर्षभर सतत पाणी उपलब्ध करून देते. जीके एनर्जीने स्थापित केलेल्या सौर कृषी पंपांमुळे शेतीसाठी पावसावर अवलंबून राहण्याची गरज आणि कृषी पंपांसाठी वीज पुरवठ्याची आवश्यकता दूर झाली आहे, यामुळे शेतकरी वर्षभरात सिंचनासाठी स्वावलंबी झाला असल्याचे सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *