आजपर्यंत तुम्ही आईचे प्रेम पाहिले, माझ्याकडून सासुचेच प्रेम मिळणार- सीईओ मिनल करणवाल

नांदेड(प्रतिनिधी)- देशाचे प्रशासन चालविण्याची जबाबदारी भारतीय प्रशासनिक (आयएएस) अधिकाऱ्यांकडे देण्यात येते. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी यांच्याकडे असते. दोन्ही वर्गांमधील राज्यसेेवेतील अधिकारी सुध्दा असतात. पण काही आयएएस व काही आयपीएस यांनी आपल्या मनात लहान पणापासूनच ठरवल्याप्रमाणे काम करतात आणि मग त्यांचे नाव विसरले जात नाही. असेच एक वाक्य जिल्हा परिषद नांदेडमधील नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी एका कार्यक्रमात सांगितल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये अनेकांच्या झोपा संपल्या आहेत. मिनल करणवाल म्हणाल्या आहेत की, माझ्याकडून सासुच्या व्यवहाराचीच अपेक्षा करा.
देशात आयएएस व आयपीएस अधिकारी यांना दुसऱ्या शब्दात ब्युरोक्रशी असे म्हणतात. लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य अशी व्याख्या आहे. पण खरे तर हेच अधिकारी फक्त सत्यावर चालले तर देशाचे वाटोळे कधीच होणार नाही. पदाधिकाऱ्यांमध्ये काय-काय चालते हे आज लिहिण्याचे काही औचित्य नाही. पण या अधिकाऱ्यांनी ठरवले मी असेच करणार तर ते तसेच करतात. आज लोकशाहीमध्ये मानवाधिकार हा एक मुळाचा मुद्दा सुरू आहे. पण कालपरवाच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या मानवाधिकार वादावर बोलतांना आम्हाला पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना हातकडी टाकून त्यांच्याकडून काम करून घेता येणार नाही. त्यांना मोकळीक द्यावी लागेल असे म्हटले आहे. म्हणजे भविष्यात मानवाधिकार हा शब्द संपेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. काम करतांना अधिकाऱ्याने आपल्या मातहत लोकांना काही म्हटले तर त्याचा गवगवा करता येत नाही. म्हणूनच कोणत्याही अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर तो आपल्या भाषणा एक वाक्य नक्कीच म्हणतो की, जाणता अजाणता माझ्याकडून कोणाचे मन दुखावले असेल तर मी त्याबद्दल आपली क्षमा मागतो. या मागे भावना एवढीच आहे की, काम करतांना एखाद्या मातहत अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याने काही चुकीचे शब्द बोलले असतील तर त्या कामाच्या संदर्भात असतात. त्याच्यासाठी व्यक्तीगत नसतात.
असेच एक वाक्य जिल्हा परिषदेच्या नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी एका निरोप आणि स्वागत समारंभात सांगितले आहे की, आजपर्यंत तुम्ही आईचे प्रेम पाहिलात परंतू माझ्याकडून तशी अपेक्षा करून नका मी तुम्हाला सासुसारखेच प्रेम देणार आहे. या वाक्यामध्ये एक प्रकारची जरब आहे. हे वाक्य सांगतांना मिनल करणवाल यांच्या शब्दांना एका अधिकाऱ्याने उत्तर देतांना सांगितले की, स्वाक्षरीसाठी आणलेल्या संचिका मिनल करणवाल यांनी कशा परत पाठवल्या आणि त्यानंतर कशा दुरूस्त करून आल्या याचे सविस्तर उदाहरण सांगितले.
मिनल करणवाल यांनी सांगितलेल्या वाक्याला जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाने खोलात जाऊन समजून घेणे आवश्यक आहे. चुका करताल तर सासू बोलणारच आणि चुका केल्या नाही तर काय बोलणार. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने मिनल करणवाल यांना प्रतिसाद दिला तरच जिल्ह्याच्या सार्वजनिक कामांचे भले होणार आहे.
कामे करणारे कंत्राटदार खरे आहेत काय?
मिनल करणवाल यांनी सासुचे प्रेम देणार असे सांगितले आहे, पण जिल्हा परिषद हा खुप मोठा विभाग आहे. जिल्हा परिषदेमध्ये जिल्हाभर काम सुरू राहते. प्रत्येक ठिकाणी जाणे मिनल करणवाल यांना शक्य होईलच असे आज तरी म्हणता येणार नाही. परंतू या बातमीला जोडून अशी अपेक्षा मिनल करणवाल यांच्याकडून होत आहे की, ज्या माणसाला जिल्हा परिषदेच्या कामाचे कंत्राट दिले आहे तोच कंत्राटदार काम करतो आहे की त्याने कोण्या इतराला ते कंत्राट काही टक्केवारीवर काम करण्यासाठी दिले आहे. याचाही शोध घ्यावा म्हणजे बरेच खोटे कंत्राटदार आपल्या समोर येतील आणि यानंतर तरी फक्त खरे आणि खरेच काम होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *