राज्यात 40 अधिकारी आणि अंमलदार राष्ट्रपती पदकाचे मानकरी; देशात 639 जणांना हा सन्मान


नांदेड(प्रतिनिधी)-देशातील 639 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. आज नांदेड जिल्ह्यात कार्यरत असलेले बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील आणि नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर हे याचे मानकरी ठरले आहेत.
विचारवंत सांगतात की,जीवन हे फक्त जगण्यासाठी आहे.. झुरण्यासाठी किंव्हा कोणाला कमी लेखण्यासाठी, कोणाला दाखविण्यासाठी मुळीच नाही.. आहे त्या यशात समाधान माणुन जीवन जगणे, जीवनाचा आनंद घेणे गरजे आहे. यशाला सिमा नाहीत. पण आयुष्याचे दिवस ठरलेले आहेत. याचा ताळमेळ जमवून जीवन जगत यशाच्या सिमा पार करत तुम्ही जगलात. यशाला सिमा नसते आणि अंतही नसतो. आपण जितके पुढे जाऊ तितक्या त्याच्या सिमा वाढत, विस्तारत जातात. क्षीतीजावर एके ठिकाणी आकाश डोंगरा टेकल्यासारखे भासते, त्या डोंगरावर गेले की आकाश पुन्हा पुढच्या डोंगरा टेकल्यासारखे भासते. या प्रक्रियासारखे यशही अंतहीन असत.

याचप्रमाणे बाळकृष्ण हनपुडे आणि द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या पोलीस जीवनातील प्रवासाची सुरूवात करतांना पाहिलेले खडतर जीवन आणि त्यावर मिळवलेले यश म्हणजेच राष्ट्रपती पदक मिळवून त्यांना आपल्या कामाची पावती मिळाली आहे. राष्ट्रपती पदक मिळवतांना या दोघांनी केलेली मेहनत, केलेले डिटेक्शन, खडतर कामे आदींचा अभिलेख तपासल्यानंतर त्यांना हे यश प्राप्त झाले आहे. आज राष्ट्रपती कार्यालयाने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे उद्या 15 ऑगस्ट रोजी त्यांना हा प्राथमिक सन्मान मिळेल. पुढे राष्ट्रपती भवन मुंबई येथे राष्ट्रपतींच्यावतीने राज्यात 40 जणांना मिळालेला हा सन्मान एका मोठ्या कार्यक्रमात वितरीत करण्यात येईल.

महाराष्ट्रा ज्या 40 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाले आहे त्यामध्ये आपल्या पोलीस जीवनाची सुरूवात नांदेेडमधून करणारे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी प्रविणकुमार ताबाजी पडवळे जे सध्या मुंबई पोलीस सह आायुक्त आहेत. त्यांचे सुध्दा नाव आहे. इतर नावे पुढील प्रमाणे विजय गिरधर पाटील (पोलीस उपमहानिरिक्षक एसीबी), राजेश नामदेव वाघ(पोलीस उपनिरिक्षक पालघर), अरुण साहेबराव सावंत (पोलीस उपअधिक्षक एसीबी अमरावती), बालकृष्ण जनार्धन हनपुडे पाटील (पोलीस उपअधिक्षक बिलोली जि.नांदेड), अधिकराव महादेव पौळ (पोलीस निरिक्षक नवी मुंबई), माया हनमंत मोरे (पोलीस निरिक्षक एसीबी ठाणे), आनंदा महादु वाघ(पोलीस निरिक्षक नाशिक शहर), संजू सिव्ही जॉन (पोलीस निरिक्षक एसीबी मुंबई), सुभाष रमेश दुधगावकर(पोलीस उपअधिक्षक अकोला), तनवीर अहेमद शेख (पोलीस निरिक्षक नवी मुंबई), मनिषा सदाशिव नलवाडे(पोलीस निरिक्षक मुंबई), विकास शिवाजी घोडगे(पोलीस निरिक्षक ठाणे शहर), अनिल बबन काकडे(पोलीस निरिक्षक अहमदनगर), व्यंकटेश सिदराम पालाकुर्ती(पोलीस उपनिरिक्षक पुणे), वालू शिवराम लाभाडे(सहाय्यक पोलीस उपनिक्षिरक्षक नाशिक शहर), अरुणकुमार बबनराव सपकाळ(पोलीस निरिक्षक मुंबई शहर), संजय उध्दव जाधव (सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एसीबी नाशिक) , उमर मन्नान शेख (पोलीस उपनिरिक्षक महामार्ग पथक हिंगोली), रविकांत बाबी कदम (पोलीस उपनिरिक्षक एसआयडी मुंबई), प्रताप नामदेव तांगडे(पोलीस निरिक्षक पुणे शहर), द्वारकादास गोविंदराव चिखलीकर (पोलीस निरिक्षक नांदेड), चंद्रकांत तुकाराम साळुंके(पोलीस उपनिरिक्षक मुंबई), दिनेश वसंत म्हात्रे(सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एसीबी नाशिक), मोहम्मद असलम शेख हमीद शेख (सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक), सुनिल मुकूंद नावार (सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मुंबई शहर), संजय संतोष माळी(सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ठाणे शहर), आंबादास सुखदेव हुलगे(पोलीस उपनिरिक्षक अहमदनगर), शामराव बाबुराव गडाक (सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नाशिक ग्रामीण), मोहन भानुदास डोंगरे (सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एटीएस पुणे), नागनाथ चंद्रकांत फुटाणे(सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सोलापूर शहर), विजय रामचंद्र अवकिरकार (सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मुंबई शहर), भानुदास यशवंत पवार (सहाय्यक समादेशक औरंगाबाद), अशोक नारायणराव लांडे(पोलीस निरिक्षक बुलढाणा), भास्कर दत्तात्रय कदम (पोलीस निरिक्षक मुंबई शहर), गुरूनाथ राजगिरी गोसावी(पोलीस उपनिरिक्षक ठाणे ग्रामीण), जगदीश नाथुजी भुजडे(सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भंडारा), विजय रंगनाथ बावीसकर (राखीव पोलीस निरिक्षक तुरची), कालीदास मथु नगारे(पोलीस निरिक्षक जळगाव), महादेव अप्पाजी पाटील(पोलीस उपअधिक्षक फौर्स-1 महाराष्ट्र) असे आहेत.
वास्तव न्युज लाईव्हने सुध्दा बाळकृष्ण हनपुडे पाटील आणि द्वारकादास चिखलीकर यांच्यासह राज्यभरात राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त करणाऱ्या सर्व 40 अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करत आहे. राष्ट्रपती पदकाची यादी जाहीर होताच पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांवर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.