नांदेड(प्रतिनिधी)-भोकर पोलीसांनी 13 ऑगस्टच्या सा यंकाळी वाहनासह 10 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा पकडला आहे. वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे.
दिलीप गोविंदराव जाधव हे भोकर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आहेत. दि.13 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामदेव बाबा ढाब्याजवळ, भोकर ते म्हैसा जाणाऱ्या रस्त्यावर वाहन क्रमांक एम.एच.44 जी 0051 ची तपासणी केली. यामध्ये विविध प्रकारचा गुटखा 4 लाख 80 हजार 500 रुपये किंमतीचा आणि 6 लाखांचे वाहन पोलीसांनी जप्त केले आहे. दिलीप जाधव यांच्या तक्रारीवरुन भोकर पोलीसांनी अन्न सुरक्षा मानके अधिनियम तसेच भारतीय दंड संहिता यानुसार वाहन चालक समिर अन्वर बेग (32) याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 292/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक रसुल तांबोळी यांच्याकडे देण्यात आला आहे.
भोकर पोलीसांनी 4 लाख 80 हजार 500 रुपयांचा गुटखा आणि 6 लाखांची चार चाकी गाडी पकडली