नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुलच्या दबावात शिक्षणाधिकाऱ्यांनी गोलमोल खुलासा लिहुन नागार्जुना पब्लिक शाळेसमोर गुडघेच टेकले आहेत. आता मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी या प्रकरणात लक्ष घालून पिडीत शिक्षकांना न्याय देण्याची गरज आहे.
वास्तव न्युज लाईव्ह नागार्जुना पब्लिक स्कुलच्यावतीने होणाऱ्या अनेक अनियमितता व शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत वेळोवेळी बातम्यांना प्रसारीत केले होते. यावर प्रशासनाने पिडीत शिक्षकांना बातम्या छापून आणता काय? अजून जास्त आणा त्याच्याने काही होत नाही असे उत्तर शिक्षकांना दिले होते. पण वास्तव न्युज लाईव्हच्या बातम्यांनंतर अखेर शिक्षण विभागाने 18 जुलै रोजी शाळा व्यवस्थापन आणि पिडीत शिक्षकांची एक बैठक बोलावली. त्यात ज्या पध्दतीने शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर बोलले त्याप्रमाणे मात्र आदेश दिला नाही असा शिक्षकांचा आरोप आहे. या सुनावणीमध्ये नागार्जुना पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, अध्यक्ष / सचिव विद्यादीप एज्युकेशन सोशल ऍन्ड कल्चरल तेलगु सोसायटी नांदेड, पिडीत सहशिक्षक अविनाश चमकुरे, अतुल राजूरकर, श्रीमती मंगला वाघमारे, नामदेव शिंदे, बालाजी पाटील आणि निशा गुडमेवार हे सर्व उपस्थित होते.
15 ऑगस्टपर्यंत तुम्ही कोणत्याही बातम्या देवू नका असे आदेश पिडीत शिक्षकांना देण्यात आले. परंतू शिक्षण संस्थांच्या समोर नेहमीच गुडघे टेकणारा शिक्षण विभाग याही वेळी असाच गुडघे टेकणाराच ठरला. बोलतांना शिक्षणाधिकारी दिग्रसकर नागार्जुना पब्लिकस्कुल व्यवस्थापनाला म्हणाले होते की, तुमच्या शाळेची मान्यता काढून घेण्यास मला दोन मिनिटे लागणार नाहीत. पण आदेशात असे काही लिहिले नाही. इंग्रजी राजवट चालणाऱ्या या नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये इंग्रजी राजवटच चालते असा शिक्षकांचा आरोप आहे. 8 महिन्यापासुन हे शिक्षक शासनाच्या दरबारी आपले पायताण झिजवत आहेत. तरी पण त्यांना न्याय मिळत नाही. माजी जिल्हा परिषद सीईओ तर अंर्तयामीच होत्या. त्यांना तर घरून कार्यालयात येण्याअगोदरच माहित असायचे की, आज मला कोण भेटायला येणार आहे आणि त्याचे काय काम मला करायचे आहे. किती भारी ना! आपल्या त्रासाने थकलेले हे पिडीत शिक्षक आता काय करतील पुढच्या कायदेशीर पायऱ्यांवर जाण्याऐवजी या शिक्षकांनी एकदा नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांना भेटायला हवे. बहुदा त्यांच्याकडून त्यांना न्याय मिळेल.
संबंधित बातमी….
https://vastavnewslive.com/2023/07/14/5-हजार-मोदक-देवून-एडीआयला-न/