खगोलीय दृष्टीकोणातून ऐतिहासीक दिवशी जन्मदिन असणाऱ्या पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकरांना समर्पित

स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर असतांना आपला चौथा जन्मदिन साजरा करणाऱ्या द्वारकादास गोविंदराव चिखलीकर यांना शुभकामना देतांना तुम्ही कधी तरी नावेत बसून हात धुतला होता म्हणूनच आजही त्या तलावाचे पाणी सुगंध पसरवत आहे. सोबतच पोलीस सेवा काळातील आपला हा शेवटचा जन्मदिवस असला तरी आपण पुढे शतकपुर्ण करावे अशा शुभकामना देतांना महाराष्ट्र शासनाने शासकीय सेवेचे दोन वर्ष 31 ऑक्टोबर 2023 च्या अगोदर वाढवावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि आपण याच खुर्चीवर पुन्हा दोन वर्ष राहिलात तर किती लोक आत्महत्या करतील आणि किती आकस्मात मृत्यू दाखल करावे लागतील याचे काही खरे नाही.
हजारो वर्षानंतर अंतरिक्षात घडणाऱ्या अनेक घटनांपैकी एक घटना यावर्षी 18 ऑगस्ट रोजी घडणार आहे म्हणून आपला जन्मदिन सुध्दा ऐतिहासीक होणार आहे. खगोल तज्ञांप्रमाणे यंदाच्या 18 ऑगस्टला आपल्याला कोणाचीच सावली दिसणार नाही. कारण अशा दिवसांना “झिरो शेड दिन’ असे म्हणतात. यावेळी सुर्य पृथ्वीच्या पुर्णपणे वरती असतो म्हणून सावल्या पडत नाहीत. असा योग हजारो वर्षानंतर येतो आणि तो योग यंदा आपल्या जन्मदिनी येत आहे.ही सुध्दा एक ऐतिहासीक घटना आहे. त्यामुळे यंदाचा आपला जन्मदिन ऐतिहासीकच मानला जाईल.
डिसेंबर 2019 मध्ये नांदेड जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर विराजमान झालेले पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी रेकॉर्डब्रेक कालखंड या खुर्चीवर पुर्ण केलेला आहे. हा कालखंड पुर्ण करतांना त्यात आलेल्या अडचणींना समुद्रातील लाटा ज्याप्रमाणे किनाऱ्यावर धडका देतात आणि पुन्हा समुद्रात जातात, परत पुन्हा किनाऱ्यावर धडक द्यायला तयार राहतात अशा प्रकारे त्या अडचणी आपण दुर केल्या. माणस ओळखायला शिकण खुप गरजेच असत. कारण काही लोक गरजेपुरतेच आपल्या समोर आपले असतात याची काही ओळख आपल्याकडे होती, काही आपण मिळवली आणि त्या आधारावर माणसांना ओळखत गेलात. पण ओळखीच्या खेळात कांही माणसांना आपण गमावल सुध्दा असो. जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा आनंदी घालवायचा असेल तर त्याला खुप काही मोठ कराव लागत नाही. छोट्‌या-छोट्या गोष्टीकडून सुध्दा आपण त्या आनंदाला पाहु शकतो. अशाच प्रकारे आपण केले आहे. परंतू काही वेळी ज्यांच्या पासून आपल्याला आनंद मिळाला त्यांना मात्र आपण अत्यंत क्षुल्लक बाबींसाठी दुर केलेल आहे. नांदेड जिल्ह्याच्या आपल्या कालखंडात आपले सहकारी आपल्या बद्दल काय बोलले? याबद्दलचे उत्तर देण्यासाठी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचा विसर आपल्याला झाला. आपल्याकडे ज्यांना वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य याचे ज्ञान नाही असे शब्दगुंड आपण पाळुन ठेवले. त्यांच्यासाठी पाठवलेले मोदक कसा प्रवास करत आहेत याचे सुंदर वर्णन आपण केलेले आहे.एक पोलीस अधिकारी म्हणून हा सर्व व्यावसायीक पणा आहे. तो आपल्या अंगी होताच, आहेच आणि तो जीवनभर टिकून राहावा अशी आमचीही अपेक्षा आहे. परंतू हे जीवन जगतांना कोठे तरी आपला म्हणून ज्याला आपण जवळ केले त्याने आपल्यासाठी काय केले याचा विसर आपल्याला पडलेला आहे. एक संत देवाबद्दल सांगतो,“माधवा माझ्यासारखे तुझ्याकडे अनंत असतील, पण तुझ्यासारखा माझ्याकडे फक्त एकच आहे.’ या शब्दाप्रमाणे ज्यांना तुमची गरज आहे ते आपली गरज तुमच्याकडून पुर्ण करून घेणारच. परंतू ज्यांना तुमची खरी गरज आहे त्यांच्या विसर तुमच्या पुढील आयुष्यात त्रासदायक असेल.


आपल्या सेवाकाळात आपण नेहमीच मी एकटाच नव्हे तर इतरही सहभागी आहेत असे वाक्य वापरलेले आहेत. काल-परवाच भारताच्या पंतप्रधानांनी मणीपुरमध्ये झालेल्या घटनेबद्दल असे बोलले होते की, मणीपुरची घटना ही समाजाला कलंकित करणारी आहे. हे सांगत असतांना त्यांनी सांगितले की, घटना कोणीतीही असो ती राजस्थानची असेल, ती छत्तीसगडची असेल तरी पण गुन्हेगारांवर कार्यवाही होणारच. यामध्ये मणीपुर राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. तसेच राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉँग्रेसचे सरकार आहे. म्हणजेच मी एकटाच दोषी नाही अशा या पंतप्रधानाच्या वाक्याचा अर्थ होतो. पंतप्रधान तर हे वाक्य काल परवा म्हणाले पण आपण तर आपल्या नांदेडच्या सेवाकाळात अनेकदा म्हटलेले आहात. आपले शब्द वापरुन पंतप्रधानांनी तयार केलेले वाक्य नक्कीच आठवणीतील राहिल.

———————————————————————————————————-

गावातील एकमेव अधिकारी ज्यांनी राष्ट्रपती पदक प्राप्त केले

चिखली ता.अहमदपूर जि.लातूर या गावातील काल परवाच पोलीस उपनिरिक्षक झालेले अभिजित द्वारकादास चिखलीकर हे चिखली गावचे 12 वे पोलीस अधिकारी आहेत. त्यांचे पिता द्वारकादास गोविंदराव चिखलीकर यांना स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला राष्ट्रपती पदक जाहीर झाले. चिखली गावातील आजपर्यंतचे एकमेव अधिकारी द्वारकादास चिखलीकर हे आहेत. ज्यांना राष्ट्रपती पदक हे प्राप्त झाले आहे. 15 जुलै 1989 पासून पोलीस दलात आलेल्या चिखलीकरांनी 28 जुलै 2017 रोजी पोलीस निरिक्षक पद प्राप्त केले. त्यातील 3 वर्ष 10 महिने एवढा कार्यकाळ नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर गाजवला. त्यांच्या जीवनात एकूण 769 बक्षीसे प्राप्त आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात आल्यानंतरच्या बक्षीसांची संख्या एकूण संख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे. नांदेड ग्रामीणमध्ये कार्यरत असतांना त्यांनी एका चोरीच्या तपासाला ज्या पध्दतीने उघडकीस आणले. त्यासाठी सुध्दा पोलीस महासंचालकांनी त्यांना उत्कृष्ट डिटेक्शन असे बक्षीस बहाल केले आहे. मागील दहा वर्षाच्या सेवापटामध्ये एक्स्ट्रॉऑडीनरी अशा पृष्ठांकनासह मागील 15 वर्षाच्या सेवा काळाचा अभिलेख तपासल्यागेल्यानंतर त्यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाले आहे.
आता राष्ट्रपती पदक प्राप्त झाले त्यानंतर चिखलीकरांच्या सेवाकाळातील फक्त 76 दिवसे शिल्लक आहेत.पदक आज फक्त जाहीर झाले आहे. प्रत्यक्षात ते पदक प्राप्त होण्याअगोदर बहुदा आपली सेवानिवृत्ती होईल म्हणून पुढच्या 76 दिवसांमध्ये मागील 34 वर्षाच्या सेवाकाळापेक्षा जास्त जबाबदारीने काम करावे लागणार आहे. एखादे वाहन जातांना त्या वाहनाचे चाक खड्यात जाते आणि त्यामुळे उडणारे पाणी आपले कपडे खराब करते एवढ्या बारकाईने त्यांना आपल्या जीवनातील मार्गांवर चालावे लागणार आहे. त् यासाठी आमच्या पण शुभकामना.

———————————————————————————————————-

आपण नांदेड जिल्ह्यात आल्यानंतर आजचे पोलीस अधिक्षक चौथे पोलीस अधिक्षक आहेत. आपण मी व्यक्तीचा नव्हे तर खुर्चीचा सेवक आहे हे वाक्य म्हणता पण आजही बदलून गेलेल्या पोलीस अधिक्षकांना किती वेळ देता, त्यांच्यासाठी काय-काय करता हे सर्वांना माहित नसेल तरी काही जणांना माहित आहे.त्यामुळे खुर्ची आणि व्यक्ती हा फरक तुम्ही जो दाखवता पण तो जोडून असतो. तरी सर्वच पोलीस अधिक्षकांना आपण दिलेली सेवा ते कोणी विसरणार नाहीत.आपल्या जीवनात वादळ येत तेंव्हा मातीत पाय घट्ट रोऊन उभ राहायचे असते. प्रश्न वादळाचा नसतो ते जेवढ्या वेगाने येत तेवढ्याच वेगाने निघून पण जातो. आपण मात्र किती सावरलो हे सर्वात जास्त महत्वाचा असत. अशाच पध्दतीने आपण चार पोलीस अधिक्षकांच्या कार्यकाळात स्वत:चे पाय घटपणे मातीत रोवून आलेल्या प्रसंगाला सामोर जाण्यासाठी आपण सज्ज राहिलेला आहात. पण आपल्या विरुध्द कोणी बोलल तर तुम्हाला ते कधी सहन झाल नाही. तो आपला राग शांत राखण्यासाठी काही लोकांनी आपल्याल सुचना दिल्या. काही वेळेस आपण त्या सुचना पाळल्या सुध्दा. आपल्या विरुध्द बोलणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व्हायला हवा कारण ते स्वत: पेक्षा तुमच्याबद्दल जास्त विचार करतात हा त्याचा अर्थ असतो. तसेच त्यातून आपल्या काय चुका झाल्या हे सुध्दा आपल्याला कळते. एक हिंदी विचारवंत म्हणतो, शौक से निकालीऐ कमीया मेरे किरदार में अगर आप नही होगे तो मुझे तराशेगा कौन। या विचारवंताच्या वाक्याला लक्षात घेतल तर तुम्हाला तुमच्यावर बोटे उचलेली माणसे आवडली पाहिजेत. म्हणजे आपली स्वत:ची प्रगती होईल. पुढच्या जीवनात इतरांचा विचार होईल तेंव्हा इतरांपुढे नम्रतेने विनंती करून त्यांच्याकडून काम करुन घेवून कतृज्ञतापुर्वक आभार मानायला विसरू नका ही सवय तुमच्यासाठी अत्यंत चांगली असेल. तुम्हाला असे वाटत असेल की, माझे वाईट चिंतले जात आहे. त्याचाही तुम्ही विचार करू नका. कारण ते तुमची बरोबरी करू शकत नाहीत तेच तुमच्याबद्दल वाईट बोलतात.जन्म घेतल्यानंतर आपली ओळख नाव दिल्यानंतर होते. मेहनत केल्यानंतर पैसा मिळतो, आपले आचार चांगले असले की, लोक आपल्याकडे चांगल्या दृष्टीने पाहतात, आपले चांगले विचार असले की, लोक अनुकरण करतात जर आपली वर्तणूक, आपली दृष्टी आणि आपले विचार वाईट असले की, आपल्या नावासकट सगळ जीवन धुळीस मिळत. याचा काहीच उपयोग आपण या जगात येवून होत नाही. म्हणून मानव जन्मास यावे आणि किर्ती रुपी उरावे. शेवटानंतर ठेवलेले नाव आपल्या पश्चातही राहिल अशी आपली जीवन शैली असायला हवी. हे सर्व शब्द विचारवंत व्यंकटेश काटकर यांचे आहेत. आता आपला संघर्षाचा काळ संपलेला आहे. त्यामुळे तुम्ही कुंदन बनला आहात तुमच्या चांगल्या कर्माचा सुगंध चारही दिशांना वाटून आपण स्वत: आनंदीत राहा आणि तो आनंद एवढा असला पाहिजे की, काट्यांच्या बनात सुध्दा मधुबन बनले पाहिजे.
आपली सेवा संपेल तोपर्यंत म्हणजे वास्तव न्युज लाईव्हची विनंती शासनाने ऐकली नाही तर दि.31 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपण 46 महिने नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचा कारभार सांभाळून अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा केलेला आहे. त्यांच्या मनात लागलेली ती सल जाईल काय? पण तुम्ही त्यावेळेस त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला हे सुध्दा योग्यच होते नसता पोलीस अधिक्षक त्रासात आले असते आणि नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेतील खुर्चीवर असा पोलीस निरिक्षक बसला असता ज्याने जिल्ह्याला त्रास दिला असता. तरी पण आपण ती सर्व नाती मंडळी सांभाळून ठेवा. कारण नाते संबंध हे आमच्या सुंदरतेवर, वयावर, व्यक्तीमत्वावर अवलंबून राहत नाहीत. नाते फक्त खरे पण, आमच्या हाताने झालेला सन्मान आणि साथ यावर अवलंबून असतात. त्यामुळे भविष्यातील जीवनात याची चिंताही आपल्याला करण्याची गरज नाही.
नांदेड जिल्ह्यात 46 महिने कामातील आता पुढे 74 दिवस शिल्लक आहेत. या 74 दिवसांमध्ये आपल्याला आणखी यश येवो अशी आमची हरीकडे प्रार्थना आहे. या सर्व कालखंडात आपण नांदेड जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांना तुरूंगाची हवा दाखवली आहे. त्यामुळे आपल्या नावाचा जरब नांदेड जिल्ह्यात कायम आहे. पण सन 2018 मध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार शिवाजी शिंदे यांची झालेली हत्या आणि त्याचा उलगडा आपल्याला झाला नाही याची खंत सुध्दा व्यक्त करावीशी वाटते. शिवाजी शिंदेची हत्या करणारा गुन्हेगार आजही मोकाट फिरतो आहे. आपल्या उर्वरीत 74 दिवसांमध्ये हे एकच काम करुन दाखवा अशी अपेक्षा आम्हाला आहे. यानंतर आपल्या अनंत कामांसाठी आपल्याला अनेकदा नांदेडला यावे लागणार आहे. त्यावेळी कोणी लोखंडी पुरूष स्थानिक गुन्हा शाखेत पोलीस निरिक्षक असला तर आजचा आपला एकही सेवक आपल्या सेवेत येणार नाही हे सुध्दा तेवढेच सत्य आहे.त्यासाठी एक समांतर सेवक मंडळी आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देवू आणि त्यांच्यासोबतच नांदेडमध्ये वावरायचे अशी नम्र विंनती आहे. “किंमत’ आणि “वेळ’ यांची “गम्मत’ असते “ज्यांच्या’बद्दल “मनात’ किंमत असते “ते’ आपल्यासाठी “वेळ’ देतील “असे’ नसते तर “ज्यांना’ आपण “वेळ’ देतो ते आपली “किंमत’ ठेवतीलच याची “खात्री’पण नसते. म्हणूनच आपण कमी वयात स्वत: च वेगळ अस्तित्व स्वत:च्या मनगटावर तयार करतांना दोष, विरोध, चर्चा, बदनामी या सर्वांमधून आलेला आहात. त्यामुळे तुमची मानसिकता आता दृढ झालेली आहे. याचा सेवानिवृत्तीनंतर उपयोग करतांना तो समाज हितासाठी करावा. “मी’ म्हणून “सगळे’ आहेत या ऐवजी “सगळे’ आहेत म्हणून “मी’ आहे हा विचार ठेवा आयुष्यात आपल्याला कधीच एकटे पणा वाटणार नाही.
व्यंकटेश काटकर म्हणतात सत्याची बाजु ही कधीही कमकुवत नसते. ती बावन कशी सोन्यासारखी शुध्द असते. त्यामुळे सत्य बोलणाऱ्याला कोणापुढे झुकायची गरज नसते. पण असत्य हे पाऱ्यासारखे असते ते कुठेही आणि कसेही लुडबुडते. त्याला कोणतीही बाजु नसते. कोणत्या बाजूने केंव्हा झुकेल काही सांगता येत नाही. म्हणून जिवनात यशस्वी होण्यासाठी आणि स्वाभिमानाने जिवन जगण्यासाठी सत्याच्या मार्गावर जाणे हेच अंतिम ध्येय निश्चित करावे. आम्ही सुध्दा “ओनली फॉर ट्रुथ’ या ब्रिद वाक्यावर जगलो आहोत आणि जगणार आहोत. आपल्याकडून सुध्दा आम्हाला अशीच अपेक्षा आहे.

काही दिवसांपुर्वी हल्यात त्रिशरण थोरातचा मनगटापासूनचा हात तुटला होता. त्या रात्री डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल यांच्यासोबत आपण सुध्दा रात्र जागून काढली होती. तुमचा नातलग नव्हता तो पण तुम्ही केलेली मेहनत आणि दाखवलेली आर्थिक तयारी अत्यंत प्रशंसनिय आहे. इकडे महिन्याचे वरवे लागलेले असतांना सुध्दा आपण ती तयारी दाखवली ही कमीत कमी काही जण जिवन पर्यंत विसरणार नाहीत. म्हणूनच चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, त्यांना मिळतात, जे “वाट’ बघतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात “प्रयत्न’ करतात पण “सर्वोत्तम’ गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या “प्रयत्नांवर’ अतुट विश्र्वास ठेवतात.. “आयुष्य’ अवघड आहे पण अशक्य नाही.यापुढे आमचे सांगणे आहे की, समज आणि तडजोड खुप कमी लोकांना समजते आणि ज्यांना हे दोन्ही समजतात त्यांना काही समजून सांगणे बाकी राहत नाही.

ज्या प्रमाणे आपल्याला वाटते त्याप्रमाणे सर्वच माणसे आपली नसतात त्यांची परख करतांना तुमच्या अनेक चुका झालेल्या आहेत. तरी पण तुम्ही आपल्या जीवनाचा गाडा आणि रेकॉर्डब्रेक एलसीबीची पोस्टींग करून तो कधीच मोडीत न निघणारा रेकॉर्ड तयार केला आहे.म्हणूनच आपल्या मागे प्रमाणिक राहणारी माणस फार कमी असतात.. पण जी असतात ती आयुष्यभरासाठी आपली असतात.. नुसतच आपल म्हणून नाही चालत.. आपल्यांनी आपल्याला मनापासून आपल समजाव लागत..
आपण ज्या पध्दतीने पोलीस कर्तव्य पार पाडले आहे. त्यातील आम्ही फक्त नांदेड जिल्ह्याचा आपला कार्यकाळ अवलोकीत केला आहे. म्हणून ज्या व्यक्तीमध्ये काही करणे आणि त्याला अंमलात आणण्याची शक्ती असते त्याचे मित्र आणि त्याचे शत्रु गल्लीबोळात असतात, असे आम्हाला म्हणायचे आहे. परंतू जीवन जगतांना तुम्ही जगाचा विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्यांना हसत आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यावर जळत.. यावरच विचारवंत म्हणतात, आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाहीत म्हणून ते मांडायचे सोडू नका कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की.
आपल जीवन जगतांना आपण केलेला संघर्ष, कधी-कधी दाखवलेली शांतता आणि कधी-कधी दाखवलेला संयम याबद्दल विचारवंत सांगतात की, “संघर्ष’ हे निसर्गाच आमंत्रण आहे, जो स्विकारतो तोच पुढे जातो, “शांतता’ हे प्रत्येक प्रश्नाला दिलेल सुंदर उत्तर असत आणि “संयम’ हे परिस्थितीला दिलेल प्रत्त्युत्तर असतं.
जगात एकच देश आहे. भारत ज्यामध्ये ज्यामध्ये दगडात प्राणप्रतिष्ठा करण्याची प्रथा आहे. प्रसिध्द कवी हरी ओम पवार सांगतात, मै वो कलम नहीं हु जो बिक जाती हु। दरबारो में शब्दों की दिप शिखा हु अभीयारे चौबारो में मै वाणी का राजदुत हु कहने की हिम्मत रखने वाला हु मेरी कलम वचन देती है अंधीयारों से लढने की, कभी किसी प्रलोभन में मेरी कलम नही बिकती और कभी भी डर के आगे दिन को रात नही लिखती मै शब्दोंका क्रांती जाल हु वर्तमान को लिखुंगा जिस दिन मेरी आग बुझेगी उस दिन मै मर जाऊंगा सत्ता का आकर्षण नही मुझे देश जले और मै कुछ नही बोलू ऐसा मै गद्दार नही कलम सिपाही बनकर जिंदा हु पिडा का लेखक हू लेखन से सिंघासन का संघर्ष कभी रुकने नही दुंगा।
अभिमान त्यावेळेस येतो ज्यावेळी आम्हाला वाटते की, आम्ही काही केल आहे. सन्मान तेंव्हा मिळतो जेंव्हा जगाला वाटत की आम्ही काही केल आहे. आपल्या नांदेड जिल्ह्याच्या कालखंडात आपल्याला जगाने सन्मान दिलेला आहे. पण त्यात बरेच काही कमी जास्त झालेले आहे. त्याच्या प्रतिक्रिया आजही येत आहेत, पुढे येतील पण 74 दिवसानंतर पोलीस विभागाशी काही संपर्क राहणार नाही त्यावेळेस सुध्दा जगाला वाटेल की, आपण काही केल आहे असेच कार्य करत राहा या शुभकामना.
विचारवंत म्हणतात कुठल्याही माणसावर टिका करतांना तुम्ही वापरलेली भाषा तुमच्या संगोपनाबद्दल आणि आलेल्या अपयशाबद्दल बरेच काही सांगून जाते.पण आम्ही ज्या लेखणीला आपल्यासाठी झिजवले आहे त्याबद्दल आम्हाला सांगायचे आहे की, “आरसा’ खुप “नाजुक’ असतो परंतू “सत्य’ दाखवतांना तो एक क्षणासाठी सुध्दा “घाबरत’ नाही आणि याच भावनेतून हे सत्य मांडले आहे. बेशुमार सा, कुछ लिखना था.. मैने तुझपर, एतबार लिख दिया..

::लेखक::

-रामप्रसाद खंडेलवाल
नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *