
चिखली,बुलढाणा(प्रतिनिधी)-जास्त संपत्ती कमावण्यापेक्षा आपल्या लेकरांना संस्कार शिकवा हीच सर्वात मोठी संपत्ती असल्याचे मत उत्तराखंड हरीद्वार येथील भागवताचार्य श्री.मनोहरप्रसाद शास्त्री यांनी व्यक्त केले.
चिखली जि.बुलढाणा येथे 8 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दरम्यान श्रीमत भागवत महापुराणची कथा भागवताचार्य श्री.मनोहरप्रसाद शास्त्री यांच्या वाणीतून जनतेला ऐकायला मिळाली. या कथेचे आयोजन चिखली येथील कैलासजी नारायणजी पांडे, राजेशजी नारायणजी पांडे आणि त्यांचे पुत्र नितीन आणि गोपाल यांनी केले होते. अधिक मास काळात भागवत कथेच्या श्रवणाचे महत्व आहे. भगवान श्री.वेदव्यास यांनी लिहिलेली ही अष्टमपुराण आहे. श्रीमद भागवत कथेत संपूर्ण वेदांचा सार आहे. या या महापुराणामध्ये 12 स्कंद आहेत. एकूण 18 हजार श्लोकांनी हे महापुराण पुर्ण होते. यामधील घटनांना जोडून आजचे जीवन त्या घटनांशी कसे संदर्भीत आहे. याचे सुंदर विवेचन आचार्य श्री.मनोहर शास्त्री यांनी केले.
आजच्या धावत्या युगात संपत्तीला खुप महत्व आहे. परंतू भरपूर संपत्ती जमवण्यापेक्षा आपल्या लेकरांना चांगले संस्कार दिले तर ती संपत्ती धनापेक्षा जास्त आहे. घरातील वडीलधाऱ्या लोकांचा आशिर्वाद मिळतो तेंव्हा जीवनाचे सुंदरकांड तयार होते. हे सांगत असतांना रामायणानंतर महाभारताच्यावेळी घडलेला प्रसंग आचार्य श्री.मनोहरजी शास्त्री यांनी सांगितला. जामुवंतांचा आशिर्वाद घेवूनच मारोतीराया मोठे झाले होते. त्याचे सुंदर विवेचन केले. सर्व कुटूंब एकत्रित राहते. त्यातील एकजुट ही प्रतिकार शक्ती वाढवते. म्हणून कमीत कमी सर्व कुटूंबिय मिळून सायंकाळचे भोजन एकत्रीत बसून करा असे शास्त्रीजी म्हणाले. आपण जसे अन्न खाऊ तसेच आपले विचार होती, ज्या प्रकारचे पाणी पिऊ तशीच आपली वाणी होईल हे सांगत असतांना बऱ्याच बाबींपासून दुर राहण्याची सुचना शास्त्रीजींनी केली.जीवनात परिवार आनंदीत असेल तर सर्वकाही आनंदच राहतो असे सांगतांना त्यांनी आजही भारतामध्ये 200 ते 350 जणांचे कुटूंब एकत्रित राहतात याची उदाहरणे दिली. त्यांच्या घरात दररोज 80 किलो पिठाच्या पोळ्या कराव्या लागतात हे सांगितले. त्या कुटूंबातील प्रत्येकाचे काम वाटून दिले आहे. त्याप्रमाणे ते होत राहते.
विदेशात भगवत गितेचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन होते. परंतू आपल्याच बालकांना, युवकांना, युवतींना भगवत गिता माहित नाही याचे दु:ख व्यक्त केले. आमच्या धार्मिक ग्रंथाचे विदेशात वाचन होत असेल म्हणूनच शास्त्रीजींनी”सारे जहॉं से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असे सांगितले. आमच्या देशात कोणी लहान मोठा नाही. सर्व जण एक आहोत हे सांगतांना आम्ही त्या पुर्वजांची लेकर आहोत ज्यांनी आम्हाला झोपेतून उठल्याबरोबर आपल्या काळ्या आईला प्रणाम करणे शिकवले. आपली चुक झाली तर क्षमा मागण्यास वेळ लावू नका. कारण एक खोटे पचवण्यासाठी 100 खोटे बोलावे लागते आणि भारतीय संस्कृतीत असत्याशिवाय दुसरे कोणतेही मोठे पाप नाही.
राजकारण आणि धर्म यावर बोलतांना शास्त्रीजी म्हणाले राजकीय पाया धर्मावरच उभा आहे. किंबहुना धर्मनितीतून राजनिती उभी राहिलेली आहे. राजतंत्राकडून ज्यावेळी धर्मावर आक्रमण केले जाते. तेंव्हा ती राजनिती समाप्त होत असते. म्हणूनच भारताच्या चारही दिशांना धर्मपिठे उभी आहेत. याप्रसंगी मैत्री विषयी बोलतांना शास्त्रीजींनी श्रीकृष्ण आणि सुदामाविषयी बोलले. त्यांच्या मैत्रीमध्ये सुदामा हा विरक्तीचा प्रतिक आहे. श्रीमद भागवत महापुराणात सुदामाचे नाव लिहिलेले नाही. परंतू त्यांच्या गुणांचे वर्णन करत ऋषी शुकदेवांनी राजा परिक्षीताला ही गोष्ट सांगितली होती. त्यामध्ये विरक्तीयुक्त मित्र आणि एक राजा हे दोन कसे मित्र आहेत याचे वर्णन करतांना सुदामा आणि श्रीकृष्णाच्या भेटीचे वर्णन विश्लेषीत केले तेंव्हा अजीतो जीतो हम: या शब्दांना उल्लेखीत करून कोणीही जिंकू शकत नाही अशाला जिंकणारा मी अशी वृत्ती ठेवा. जीवनात सेवा द्यायला तयार राहा. तुमची सेवा आपोआप होईल त्यासाठी काही प्रयत्न करण्याची गरज तुम्हाला नाही.
काल दि.15 ऑगस्ट रोजी नांदेड येथून रामप्रसाद चोटीया, संतोषी चोटीय, गोपिकिशन पिपलवा, दिपक बढाढरा आणि वास्तव न्युज लाईव्हचे संपादक कंथक सुर्यतळ हे या भागवत कथा समारोहात कथा श्रवणासाठी गेले होते. मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या या श्रीमद् भागवत कथाची सांगता आज होत आहे.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी चिखली जिल्हा बुलढाणा येथील खंडेलवाल समाजाने भरपूर मेहनत घेतली आहे.
