पत्नीचा गळाआवळून खून करणाऱ्यास जन्मठेप

बिलोली (प्रतिनिधी)-पत्नीचा गळाआवळून खून करणाऱ्या 25 वर्षीय युवकाला बिलोली अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.बी.बोहरा यांनी जन्मठेप आणि चार हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
बोमनाळी ता.मुखेड येथील शिक्षक बापू निवृत्ती घोडके यांची मुलगी दिक्षाचे लग्न गंगाराम सोनकांबळे यांचा छोटा मुलगा यादू उर्फ यादव गंगाधर सोनकांबळे याच्यासोबत 10 मे 2017 रोजी झाले होते. लग्नात हुंडा म्हणून 1 लाख 50 हजार रुपये व एक दुचाकी गाडी,5 ग्रॅम सोन्याची अंगठी आणि संसारउपयोगी साहित्य दिले होते. पण लग्नात ठरलेल्या हुंड्यातील 50 हजार रुपये व दुचाकी देणे शिल्लक राहिले होते.
30 मार्च 2018 रोजी दिक्षाला यादु उर्फ यादव गंगाधर सोनकांबळे, त्याचे आई-वडील आणि भाऊ यांनी लग्नात राहिलेले 50 हजार रुपये व दुचाकी आण म्हणून शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आणि तिला हा त्रास नेहमीच होता. 15 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी दीक्षाचे वडील शिक्षक बापू निवृत्ती घोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 304(ब), 498(अ) आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 367/2018 देगलूर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रल्हाद गिते यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. न्यायालयात या प्रकरणी पाच साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध असलेल्या सर्व पुराव्यांचा विचार करून न्यायाधीश व्ही.बी.बोहरा यांनी मयत दीक्षाचा नवरा यादु उर्फ यादव गंगाधर सोनकांबळे यास भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे जन्मठेप व 2 हजार रुपये रोख दंड, दंड न भरल्यास 1 वर्षाची सक्तमजुरी तसेच भारतीय दंड संहितेच्या 498 (अ) प्रमाणे तीन वर्षाचा साधा कारावास व दोन हजार रुपये रोख दंड दंड न भरल्यास सहा महिन्याचा साधा कारावास अशा शिक्षा ठोठवल्या या सर्व शिक्षा यादु उर्फ यादव सोनकांबळेला सोबत भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता एस.बी.कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून देगलूरचे पोलीस अंमलदार माधव गंगाराम पाटील यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *