नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाचा कोयत्याने हल्ला करून मनगटापासून हात तोडल्याचा दुसरा प्रकार एका महिन्यात घडला आहे.
मोहम्मद इमरान अब्दुल अजीज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे घर इतवारा पेालीस ठाण्याच्या हद्दीत आहे व त्यांचे कुटूंब फु्रटच्या दुकानावर काम करून आपले जीवन चालवतात. आसिफ कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आठवडी बाजारामध्ये लसन विकण्याचे काम सुध्दा करतात. आठ दिवसांपुर्वी त्यांची ओळख मोहम्मद तोहिद मोहम्मद रफिक याच्यासोबत झाली. मोहम्मद तोहिद हा सतत त्यांच्या भावाला चिडवायचा आणि त्याची थट्टा करायचा. तोहिद सुध्दा मुळचा वाशिमचा रहिवासी असून बाजारामध्ये फळांचा गाडा लावून व्यापार करतो.
दि.16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास मला फोनवरून दुसऱ्यांनी माहिती दिली की, माझा भाऊ मोहम्मद अजहर यास मोहम्मद तोहिद मोहम्मद रफिक (23) याने हातावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जिवेमारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्याचा डावा हात मनगटापासून तुटला आहे. तो फक्त त्वचेच्या सहाऱ्यावर लटकत आहे.मोहम्मद अजहरच्या मानेवर सुध्दा धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपल्या भावाची भेट घेवून मी तक्रार देत आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 326, 504, 506 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 321/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रामकृष्ण पाटील हे करत आहेत.
एका महिन्यात दुसऱ्यांदा मनगटापासून युवकाचा हात तोडल्याचा प्रकार