ॲड.वैभव गायकवाड आणि प्रज्ञा पाईकराव यांच्यासह 12 जणांची सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी निवड

 

# महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले उल्लेखनीय यश 

नांदेड ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून येथील जिल्हा सत्र न्यायालयातील ॲड. वैभव गायकवाड आणि ॲड. प्रज्ञा मधुकरराव पाईकराव यांनी पहिल्याच प्रयत्नात चमकदार कामगिरी करत या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे.

 

लहानपणा पासूनच अतिशय हुशार आणि अभ्यासू वृत्तीचे असलेले वैभव गायकवाड हे नायगाव तालुक्यातील देगाव येथील मूळ रहिवासी असून नांदेड शहरातील देगावचाळ भागात ते वास्तव्यास आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या वैभव गायकवाड यांनी कायद्याचे शिक्षण नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड येथून एलएलएम पदवी संपादन केली. तसेच येथील जिल्हा सत्र न्यायालयात सन २००९ पासून त्यांनी वकिली सुरू केली. वकिली व्यवसाय करीतच अतिशय जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट – अ परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात सुयश संपादन केले आहे. तसेच ॲड. प्रज्ञा मधुकरराव पाईकराव ( एलएलएम, नेट ) यांनी देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट – अ परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात सुयश संपादन केले आहे. या यशाबद्दल ॲड. अशोक देवकरे,ॲड. व्यंकटेश गोळेगावकर,ॲड. माणिकराव नरवाडे,ॲड. शेख एम. एफ.ॲड.बालाजी बिरदे,ॲड. डी. एस. सोनटक्के, ॲड. सी. एम. जेठेठेवाड,ॲड. जगजीवन भेदे,ॲड. सिध्दार्थ पवार आदीसह मित्रमंडळींनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील यशस्वी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या परीक्षेत इतर यशवंत वकील पुढील प्रमाणे आहेत.

अनुप लखोटिया, क्रांतीकुमार कोलवार, सुजाता आचमारे, आरती कुलकर्णी, लखन पांचाळ, सचिन सोमवंशी, वाडीकर, मनीषा गायकवाड, भीमराव शेळके असे आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *