नांदेड(प्रतिनिधी)-अवयव दान करण्याचा संकल्प सर्वांनी घेतला तर त्यामुळे अनेकांचे जीव वाचतील, अवयव रुपाने आपण स्वत: सुध्दा जीवंत राहु या शब्दांना मान देऊन प्रत्येकाने अवयव दानाची तयारी दाखवायला हवी.
नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे हे अवयव दान चळवळीचे नांदेडमधील प्रणेते आहेत.त्यांनी अवयव दानावर पुस्तक लिहिले आहे. ज्या व्यक्तीचा मेंदु संपतो त्या व्यक्तीचे इतर अवयव जसे डोळे, लिव्हर, हृदय असे अवयव इतरांच्या जीवनासाठी जीवनदायी ठरतात. या अवयवांना विहित वेळेत गरज असलेल्या ठिकाणी पोहचविण्याची एक मोठी जबाबदारी असते. त्यासाठी प्रशासन सदा तत्पर असते. नांदेडमधून एक हृदय औरंगाबादला पाठविण्यासाठी विशेष विमानाची सोय प्रशासनाने केली होती. नांदेड शासकीय रुग्णालय ते विमानतळ हे अंतर 23 किलो मिटरचे आहे. पण ते फक्त 13 मिनिटात पार करून प्रशासनाने ते हृदय विमानतळावर पोहचवले. त्यामुळे ज्याला हृदयाची गरज होती त्याला नवीन हृदय मिळाले आणि मरणारा व्यक्ती त्या व्यक्तीच्या रुपात जीवंत राहिला.
आपल्या परंपरागत पध्दतीने वेगवेगळ्या विचारांच्याकड्यांमध्ये आम्ही अडकलो आहोत. परंतू अवयव दान केल्याने आपण जीवंत राहु यावर आम्ही विचारच करत नाहीत. अवयव दान चळवळीचे प्रणेते ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे यासाठी खुप मेहनत घेतात. अनेक जागी त्यांचे व्याख्यान होतात. काही लोकांनी त्यांची पुस्तके खरेदी करून वाचनालयांमध्ये दिली. त्यामुळे अवयवदान का आवश्यक आहे हे आता लोकांना कळायला लागले आहे. पण काही लोक आजही आपल्या परंपरागत पध्दतीमध्ये अडकलेले आहेत. आज आम्ही विज्ञान युगात जगत आहोत, आम्ही चंद्र आणि मंगळावर जाण्याच्या तयारीत आहोत. अशा परिस्थितीत सुध्दा आम्ही परंपरेचा विचार करतो याच्यामध्ये बदल होण्याची गरज आहे.
एखादा व्यक्ती मरण पावला तर त्याचा मृतदेह लवकरा लवकर रुग्णालयात पोहचती करणे हा सर्वात मोठा विषय यात आहे. अपघात झालेले व्यक्ती, आत्महत्या केलेले व्यक्ती यांचे देह घेतले जात नाहीत. तेंव्हा जो व्यक्ती आपल्या नैसर्गिक मृत्यूने मरतो त्याच्याच अवयवांची किंमत आहे.तसेच काही अपघातांमध्ये फक्त मेंदुला मार लागला आणि इतर सर्व शरिर छान आहे तर त्या व्यक्तीचे सुध्दा अवयव कामाला येतात. सोबतच अवयव दानासह देहदानाची परंपरा अंमलात आली तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणी ठरले. कारण मरण पावलेल्या व्यक्तीच्या शरिरामध्ये कोणत्या अवयवांमध्ये काय समस्या होती, कशामुळे ती झाली होती. याचा अभ्यास त्यांना करता येईल आणि वैद्यकीय क्षेत्रात सुध्दा संशोधन होवू शकेल.
फक्त अवयवदानच नव्हे तर देहनाची संकल्पना रुजली पाहिजे